मुंबई - Bigg Boss 17 : सलमान खान त्याच्या सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या नवीन 17 सीझन हा 15 ऑक्टोबरपासून घेऊन आला आहे. 'बिग बॉस'च्या प्रेक्षकांमध्ये या शोबद्दल खूप उत्सुकता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 'बिग बॉस'चा नवा सीझन कलर्स टीव्हीवर प्रसारित होतोय. हा शो सुरु झाल्यापासून खूप चर्चेत आहे. दरम्यान 'वीकेंड का वार'मध्ये होस्ट सलमान खाननं स्पर्धकांचे गैरसमज दूर केल्यानंतर, या शोमध्ये अनेक खुलासे झाले आहेत. आता या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विक्की जैन या दाम्पत्यामध्ये जोरदार वादावादी झाल्याचं पाहायला मिळत असताना, अंकितानं पती विकीकडे लक्ष आणि वेळ न दिल्याची तक्रार केली.
विकी जैन आणि अंकिता लोखंडेचं भांडण : विकी जैन तिला म्हणतो की, 'मी तुझ्या भोवती मागे मागे फिरू शकत नाही. तो इथे नाक कापून घ्यायला आलेलो नाही'. त्याला प्रत्युत्तर देताना अंकिता म्हणते की, 'माझ्यावर या गोष्टीचा परिणाम होतोय.'. पुढे तो म्हणतो, 'माझ्याकडून हे होणार नाही'. 'बिग बॉस'मध्ये सध्या अंकिता आणि विकीमध्ये वाद पाहायला मिळत आहेत. दोघांची अनेक विषयांवर वेगवेगळी मतं असतात. या जोडप्यामध्ये मतभेद स्पष्ट लक्षात येतात. या शो दरम्यान अंकिता रडतानादेखील दिसली होती. या दोघांच्या नात्यामध्ये काहीसा कडवटपणा दिसून येतोय. याशिवाय अभिनेत्री मन्नारा चोप्रा देखील खूप प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. घरातील वातावरणाने उत्साहित राहावे यासाठी ती रॅपिंग करत दिसते.