मुंबई - Bigg Boss 17 : अभिनेता सलमान खानचा सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' मध्ये दररोज अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये भांडण होताना दिसतात. जसजसा अंतिम दिवस जवळ येत आहे तसतसा हा शो अधिक रंजक होत आहे. या आठवड्यात करण जोहरनं 'वीकेंड का वार' होस्ट केला. यावेळी करणनं काही स्पर्धकांना खडे बोल सुनावले. या यादीत अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याचंही नाव आहे. विकी आणि अंकिताबद्दल आता शोमध्ये बरेच चर्चा होताना दिसते. याशिवाय सोशल मीडियावर अनेकजण विकीवर निशाना साधताना दिसतात. तर अनेकज जण अंकिताची पाठराखण करताना दिसतात.
'वीकेंड का वार'मध्ये करणनं दिला विकी झटका :'वीकेंड का वार'मध्ये करणनं विकीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानं विकीला म्हटलं, 'जेव्हा तुझी आई अंकिताला राष्ट्रीय टीव्हीवर खडे बोल सुनावत होती, तेव्हा तू तुझ्या पत्नीची बाजू का घेतली नाहीस?'' त्यावेळी विकीनं करणची माफी मागितली. यानंतर करण गेल्यावर विकीही गप्प बसला नाही. त्यानं याबाबत अंकिताशी बोलून आपला राग काढला. अंकितासोबत बोलताना विकीनं कुटुंबाची बाजू घेतली. त्यानं अंकिताला म्हटलं, ''माझ्या घरच्यांनी तुला कधी ड्रेसिंग स्टाईलबद्दल काही म्हटलं का? लग्नानंतर 10 दिवसही तू माझ्या कुटुंबासोबत राहिली नाहीस. यावर कोणी आक्षेप व्यक्त केला नाही.''