मुंबई - Bigg Boss 17:'बिग बॉस 17' च्या घरात स्पर्धक म्हणून प्रवेश केलेला मुनावर फारुकी हा चाहत्यांचा आवडता बनला आहे. या शोमध्ये तो दररोज प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मुनावरची मन्नारासोबतची केमिस्ट्री लोकांना आवडते. सुरुवातीपासूनच मुनावर फारुकी शांत आणि समजूतदार स्वभावामुळं बिग बॉसच्या नजरेत चांगला आहे. बिग बॉस 17 च्या नवीन एपिसोडमध्ये, बिग बॉसनं त्याला अतिशय महत्त्वाचे काम सोपवलं आहे, यामुळं त्याला त्याच्या करिअरमध्ये खूप फायदा होणार आहे. एपिसोडमध्ये, बिग बॉसनं मुनावरला कन्फेशन रूममध्ये बोलावलं आणि त्याच्यासोबत स्टँड-अप कॉमेडी टॅलेंटबद्दल काही कानगोष्टी सांगितल्या.
मुनावर फारुकीला दिल बिग बॉसनं टास्क :बिग बॉसनं मुनावरला स्टँड-अप कॉमेडी शो करण्याचे काम दिलं. त्याला शोची तिकिटे 'विक्री' आणि घरातील सदस्यांनी हा शो पाहायला येण्यासाठी पटवायचे होतं. घरातील सदस्यांना 5000 BB चलन देण्यात आले. या चलनाद्वारे घरातील सदस्य खाद्यपदार्थ किंवा मुनावरच्या कॉमेडी शोच्या तिकिटांवर खर्च करू शकतात, असं यावेळी सांगण्यात आलं होतं. या टास्कमध्ये जर मुनावर यशस्वी झाला तर त्याला आवश्यक वस्तू मिळेल असं सांगितलं गेलं होत. मुनावरनं घरातील अनेक सदस्यांशी याबाबत संवाद साधला आणि हे काम त्याच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे त्यानं पटवून दिलं. यावेळी तो बहुतेक मुलींना पटवण्यात यशस्वी झाला. आरा, ऐश्वर्या आणि अनुराग यांनी कॉमेडी शो पाहण्याऐवजी जीवनावश्यक वस्तू खरेदी करणं पसंत केलं.