मुंबई - Isha vs Abhishek cat fight : वादग्रस्त टीव्ही शो 'बिग बॉस 17' च्या स्पर्धकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही धक्कादायक रहस्ये या शोद्वारे उघड केली आहेत. ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा या शोदरम्यान झाल्या आहेत. शोमध्ये येण्यापूर्वीच ईशानं अभिषेकवर अनेक आरोप केले होते. यावेळी पुन्हा एकदा ईशानं शोमध्ये तिच्या पूर्वीच्या नात्याशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे. ईशाने सांगितलं की, मी एका पार्टीमध्ये मोबाईलवर टाईप करून कोणालातरी सांगत होते की, माझा बॉयफ्रेंड असा आहे. अभिषेकनं मला विचारलं की, तुझे इतके मित्र आहेत का? मी त्यावेळी हो म्हणाले या मुलींना मी ओळखते. यानंतर मी काही बोलण्यापूर्वीच अभिषेकनं मला जोरदार झापड मारली''.
ईशा मालवीय केला धक्कादायक खुलासा : त्या झापडनं माझ्या डोळ्याखालील भाग काळानिळा पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सेटवर गेल्यावर आईला कळलं की हे अभिषेकमुळेच झालं आहे. ईशाचे हे शब्द ऐकून विकीला धक्काच बसला. ईशा आणि अभिषेक सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरात आहेत. शोमध्ये येण्यापूर्वीच दोघांचा ब्रेकअप झाला होता. अभिषेकच्या आक्रमक वर्तनामुळे ईशानं वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. आता ईशा समर्थ जुरेलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. समर्थ सध्या बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालत आहे. ईशा ही 'बिग बॉस 17'मध्ये बऱ्याचदा अभिषेकसोबत वाद करताना दिसते.