मुंबई - Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' शेवटच्या टप्प्यात असून या शोमध्ये या आठवड्यात फॅमिली वीक दरम्यान ज्योतिषीनेही बिग बॉसमध्ये प्रवेश केला. शनिवारच्या एपिसोडमध्ये घराघरात पोहोचलेल्या ज्योतिषानं घरात उपस्थित स्पर्धकांच्या भविष्याबद्दल सांगितलं. अनेकांना सावधपणे चालण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. ज्योतिषानं अंकिता आणि विक्कीबाबतही भविष्यवाणी केली. अंकिताबद्दल ज्योतिषीनं सांगितलं, ''2001 नंतरचा तुझा काळ खूप छान गेला आहे. तुम्ही यश मिळवले तसेच प्रसिद्धी मिळवली आहे. चांगले जीवन जगले आहे. तुमच्या भविष्यात आणखी चांगले क्षण येणार आहेत.'' ज्योतिषीनं पुढं सांगितलं, तू आणखी यशस्वी होणार आहे. काही मोठे निर्णय होतील. प्रत्येक गोष्ट विचार करूनच करावी लागेल. एप्रिलपूर्वी तुम्हाला कोणत्याही मोठ्या निर्णयापासून दूर राहावे लागेल.''
विकी आणि अभिषेकचं भविष्य :यानंतर विकीच्या बाबतही भविष्यवाणी केली. विकीला यावेळी सांगितलं, ''तू भावनिक असून प्रत्येक परिस्थितीत समोरच्या व्यक्तीकडून समान प्रतिसादाची अपेक्षा करतो. पण नेहमी तुला प्रतिसाद मिळेल असं होत नाही. तुला कोणाकडून काही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही.'' यानंतर अभिषेकबाबत ज्योतिषीनं म्हटलं, ''तू खूप भावूक व्यक्ती आहे. सध्या तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तुमचं पण नाव मोठं होईल. तू तुझ्या रागावर नियंत्रण ठेव. रागचं तुमच्यासाठी अडथळा आहे.'' अभिषेकनं प्रेमाबद्दल विचारले असता, ज्योतिषींनी त्याला करिअरवर लक्ष केंद्रत करण्याचा सल्ला दिला.