मुंबई - Ankita Lokhande Reveals :अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये दररोज भांडणं पाहायला मिळणं नवीन राहिलेलं नाही. शोमधील स्पर्धा इतकी वाढली आहे की, मित्र असो किंवा पती-पत्नी, प्रत्येक नातेसंबंध वेगळे होताना दिसत आहेत. शोमधील प्रत्येक स्पर्धकाला टास्क कोणत्याही किंमतीत पूर्ण करायचे असते. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं नात देखील अतिशय संवेदनशील टप्प्यावर आहे. दरम्यान, अंकितानं तिच्या आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अंकिता लोखंडेचे विक्की जैनसोबत शोमध्ये रोजच वाद पाहायला मिळत आहेत.
मुनावर फारुकी केला आयेशा खाननं आरोप : अंकिताचे विक्कीसोबतच्या वैवाहिक जीवनातील नात वाईट टप्प्यातून जात आहे, त्यामुळे अंकिताचे अनेक चाहते सध्या नाराज दिसत आहेत. मात्र, काही चाहते तिला सोशल मीडियावर पाठिंबा देताना देखील दिसत आहेत. अंकिता एका एपिसोडमध्ये म्हणताना दिसली की, तिलाही विश्वासघाताचा सामना करावा लागला आहे. यानंतर आयेशा खान रडत रडत अंकिताला सांगते की, ''मुनावर फारुकी जेव्हा नाझिला सीताशीला डेट करत होता, तेव्हा त्यानं तिच्याशी संपर्क साधला होता.'' यानंतर आयेशानं अंकिताला पुढं सांगितलं की, ''या सगळ्यात माझा काय दोष? मी कधीच त्याचे किंवा कोणाचेही वाईट केले नाही. जर तो नाझिलासोबत रिलेशनशिपमध्ये असेल आणि तिच्यासोबत सर्वकाही त्याला चालू ठेवायचे असेल तर, त्यानं माझ्याशी संपर्क साधायला नको होता.''