मुंबई - Ankita lokhande :अलीकडेच अभिनेत्री अंकिता लोखंडेनं 'बिग बॉस 17'च्या घरात गर्भधारणा चाचणी केली. त्यानंतर आता तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की ती खरोखरच गर्भवती आहे की नाही. आता यावर एक अपडेट समोर आली आहे. या प्रेग्नेंसी टेस्टनंतर अंकिता लवकरच या शोला टाटा बाय बाय करणार असल्याचं समोर आलं होत. अंकिता लोखंडेची प्रेग्नेंसी टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. अलीकडेच, इंस्टाग्रामवर एका फॅन पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये अंकिता म्हणते की, 'मला वाटते की मी आजारी आहे. माझी तब्येत बरी नाही. मला मासिक पाळी येत नाही. मला घरी जायचे आहे'. त्यानंतर अनेकांना वाटल की ती प्रेग्नेंट आहे. दरम्यान 'बिग बॉस 17'च्या घरातील सदस्यांनी बिग बॉसवर विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांना अतिरिक्त सुविधा दिल्याचा आरोप केला होता.
अंजली अरोराची होईल एंट्री :बिग बॉसमध्ये या आठवड्यात सहा स्पर्धकांचं नामांकन झालं आहे, ज्यामध्ये अंकिता लोखंडे, सना रईस खान, जिग्ना व्होरा, अनुराग डोवाल आणि तहलका हे रेड झोनमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंजली अरोरा लवकरच बिग बॉसच्या घरात वाइल्डकार्ड एंट्री म्हणून प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत एक पोस्टही व्हायरल होत आहे. अंजली अरोराची एंट्री झाल्यानंतर या शोमध्ये मुनावर फारूकीसोबत तिची केमिस्ट्री चांगली राहिल की नाही, याबद्दल अनेकजण उत्सुक आहे. कारण यापूर्वी दोघेही लॉकअपमध्ये दिसले होते. या शोचा विजता मुनावर होता.