महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Bigg boss 17 : 'बिग बॉस 17' अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा झाल्या भावूक; नात्यांमध्ये आला दुरावा... - सलमान खान

Bigg boss 17 : सलमान खानचा शो 'बिग बॉस 17' हा 15 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. दरम्यान या सीझनबद्दल जोरदार चर्चा होत आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं सध्या दिसत आहे.

Bigg boss 17
बिग बॉस 17

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 4:17 PM IST

मुंबई -Bigg boss 17 :सलमान खानचा शो 'बिग बॉस' हा कायम चर्चेत असतो. हा शो 15 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. शोमधील सर्व स्पर्धक त्यांचा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेl. 'बिग बॉस 17' सीझनमध्ये ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट आणि अंकिता लोखंडे-विकी जैन हे दोन स्टार जोडपेही दिसत आहेत. दरम्यान या सीझनमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण आलाय. 'बिग बॉस'मध्ये आल्यानंतर या जोडप्यांमधील आंबटपणा दिसत आहे. अवघ्या 2 दिवसांत अंकिता विकीवर चिडली आहे. दरम्यान आता या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमध्ये अंकिता भावूक होताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात विकी सगळ्यांसोबत मिसळत आहे. याशिवाय ऐश्वर्या शर्मा देखील या शोमध्ये नाराज झाल्याचं दिसत आहे.

अंकिता लोखंडेचा विकीवर राग : प्रोमोमध्ये अंकिता विकीला म्हणते, 'तू रिलेशनशिपला खूप कॅज्युअल घेत आहेस. तू मला सांगितलेस की आपण एकत्र राहू. पण आपण एकत्र नाही. तुझा आधार म्हणून मी बिग बॉसमध्ये आले होते. जग मला कोणी दुखवू शकत नाही, फक्त माझी व्यक्तीच दुखवत आहे. मला त्रास होत आहे. मी एकटी आहे. अंकिता आणि विकी हे खूप मजबूत स्पर्धक आहे. याशिवाय अंकिताचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, त्यामुळे ती शेवटपर्यत या शोमध्ये राहू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय.

नील आणि ऐश्वर्या गोंधळले : ऐश्वर्या आणि नीलबद्दल बोलायचं झालं तर शोमध्ये दोघेही थोडे गोंधळलेले दिसत आहेत. याबद्दल बिग बॉसनं त्याच्याशी चर्चा केली. यादरम्यान नील तिला म्हणतो की, 'आपण कंटाळलो आहोत हे मान्य करावे लागेल', तर यावेळी ऐश्वर्या खूपच भावूक दिसत असून तिचे अश्रू वाहू लागतात. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की, 'शेवटी काय करायचं समजत नाही'. त्यानंतर ती बिग बॉसला विचारते की, 'तुमचा फॉरमॅट काय आहे? या शोबद्दल मला एक गोष्ट मला माहित नाही. माझी मनःस्थिती वाईट होत आहे. मी समजण्यास असमर्थ आहे'. त्यानंतर नील ऐश्वर्याला सांगतो, इथे बरेच लोक आपल्याला वेगळे करायचे पाहत आहे. लोकांच्या बोलण्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये असं त्यांन तिला समजवले.

हेही वाचा :

  1. Koffee With Karan 8 : कॉफी विथ करण 8 व्या पर्वासाठी करण जोहर सज्ज, शेअर केली सेटची झलक
  2. Ganpath : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ'चा प्रोमो झाला प्रदर्शित; रिलीजच्या पहिल्या दिवशी किती करेल कमाई...
  3. Prabhas Wedding : अभिनेता प्रभासला यंदा कर्तव्य आहे... जवळच्या व्यक्तीने दिली बातमी

ABOUT THE AUTHOR

...view details