मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खान ( actor Salman Khan ) बिग बॉसच्या 16व्या सीझनचा ( 16th season of Bigg Boss ) होस्ट म्हणून परतण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी बिग बॉस 16 च्या प्रोमोजद्वारे ( Bigg Boss 16 promos ) प्रेक्षकांमध्ये शोबद्दलची उत्कंठा वाढवली आहे. परंतु प्रीमियरची तारीख आणि स्पर्धक याबद्दलचा तपशील गुलदस्त्यात ठेवला आहे.
मंगळवारी, सर्वात वादग्रस्त टेलिव्हिजन रिअॅलिटी शोपैकी एक, बिग बॉस सीझन 16 च्या निर्मात्यांनी नवीन प्रोमोचे लॉन्चिंग केले. या सीझनमध्ये बिग बॉस स्वत: खेळणार असल्याचं ऐकल्यानं सलमान प्रोमोमध्ये एक ट्विस्ट उघड करताना दिसला. यंदाच्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत कोणतेच नाव समोर आलेले नाही. असे दिसते की निर्माते यावर्षी स्पर्धकांची नावे उघड करण्याबाबत अधिक सावधगिरी बाळगत आहेत.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर शहनाज गिल सलमान खानसोबत बिग बॉस 16 होस्ट करणार आहे. बिग बॉस सीझन 16 च्या अधिकृत प्रीमियरची तारीख अद्याप प्रलंबीत आहे परंतु रिअॅलिटी शो 1 ऑक्टोबर रोजी छोट्या पडद्यावर येत असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉस 16 प्रीमियर भाग दोन भागांमध्ये विभागला जाईल आणि त्याचा दुसरा भाग रविवार, 2 ऑक्टोबर रोजी प्रसारित केला जाईल.