महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Navya Naveli Nanda drives a tractor : गावात ट्रॅक्टर चालवतांना बिग बींची नात नव्या नवेली नंदा - अमिताभ बच्चन

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात, उद्योजक नव्या नवेली नंदा यांनी गुजरातमधील एका गावात ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Navya Naveli Nanda
नव्या नवेली नंदा

By

Published : May 20, 2023, 3:01 PM IST

मुंबई : दिग्गज अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने गुजरातमधील एका गावात ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. आरा हेल्थ या महिला-केंद्रित हेल्थ टेक कंपनीच्या सह-संस्थापक असलेल्या नव्याने गुजरातमधील एका गावात गेली होती. त्यानंतर नव्याने तेथील स्थानिक महिलांची भेट घेतली. यावेळी तिने लक्झरी कारऐवजी तिथे ट्रॅक्टर चालवला. शिवाय तिने इन्टाग्रामवर ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने गुजरातमधील गणेशपुर या गावी भेट दिली. नव्या ट्रॅक्टर चालवताना पांढऱ्या प्रिंटेड कुर्तामध्ये होती यावेळी तिने फार कमी मेकअप केला आहे या लूकमध्ये नव्या ही फार साधी दिसत आहे. तिने व्हिडिओला कॅप्शन दिले 'गणेशपुरा, गुजरात.'

नव्या नवेली नंदा ट्रॅक्टर चालवताना :हा व्हिडिओ अपलोड होतांच अनेक युजरने या व्हिडिओवर कमेंट केली आहे. तसेच नव्याचे उद्योजक म्हणून आणि तिच्या ड्रायव्हिंग कौशल्याबद्दल व नम्र स्वभावाचे कौतुक केले आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली 'हे खूप सुंदर आहे! तुमचे साहस आणि तुम्ही करत असलेल्या कामावर प्रेम करा! तसेच, जेव्हा तुम्हाला महिलेकडून फूल मिळाले तेव्हा तो क्षण! खूप मौल्यवान!' तर दुसर्‍याने लिहिले, 'तुम्ही सर्वात अद्वितीय सेलिब्रिटी मुलांपैकी एक आहात.' अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर आल्या आहे. काही दिवसांपुर्वी नव्याने माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले होते, की, ती अभिनयच्या क्षेत्र कधी प्रोफेशन म्हणून निवडणार नाही असे तिने उघडपणे सांगितले होते.

'द आर्चीज'मध्ये झळकणार नव्या : तिने म्हटले की, 'मला वाटते की मी प्रामाणिकपणे त्यात फारशी चांगली नाही. मला विश्वास नाही की तुम्ही ते करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे.' असे तिने सांगितले होते. नव्या ही बिग बीची मुलगी श्वेता बच्चन आणि तिचा उद्योगपती-पती निखिल नंदा यांची मुलगी आहे, जो अभिनेता करीना कपूर आणि रणबीर कपूरचा चुलत भाऊ आहे. तिला अगस्त्य नावाचा एक भाऊ देखील आहे, जो झोया अख्तरच्या 'द आर्चीज' च्या रुपांतरातून अभिनयात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

हेही वाचा :Uorfi Javed latest look : पुन्हा एकदा उर्फी जावेद तिच्या आउटफिटमुळे चर्चेत

ABOUT THE AUTHOR

...view details