महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Big B turns 80: तुम्हासम कोणी कधीच नव्हते आणि होणार नाही, नातीकडून बिग बींना शुभेच्छा - नव्या नवेलीची बिग बींसाठी पोस्ट

अमिताभ बच्चन यांना 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. श्वेता व्यतिरिक्त, अमिताभ यांची नात नव्याने देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

By

Published : Oct 11, 2022, 10:07 AM IST

मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार, अमिताभ बच्चन 80 वर्षांचे झाले आहेत आणि त्यांच्या खास दिवसानिमित्त त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिने सोशल मीडियावर त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टाग्रामवर श्वेताने तिच्या वडिलांसोबत घालवलेले मनमोहक क्षण दर्शविणारी छायाचित्रे शेअर केली आहेत.

एका फोटोत, आपण बिग बी लहान श्वेताचा हात धरलेले आपण पाहू शकतो. आणखी एका फोटोत छोटे बिग बी त्यांचे दिवंगत वडील हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांच्यासोबत उभे दिसत आहेत.

कॅप्शनसाठी, श्वेताने आबिदा परवीन आणि नसीबो लाल यांच्या तू झूम गाण्याचे बोल वापरणे निवडले. "पीरा नु मैं सीने लावां

ते मैं हसदी जावां

धुप्पां दे नाल लड़ लड़ के

मैं लाभियाँ अपनीयां छावां

दुःख वि अपने सुख वि अपने

मैं ते बस एह जाना

सब नु समझ के की करना ऐ

दिल नु एह समझावां

तू झूम झूम झूम झूम

तू झूम झूम झूम झूम - To my grand old man Happy 80th Birthday -'' असे तिने लिहिलंय.

श्वेता व्यतिरिक्त, अमिताभ यांची नात नव्याने देखील 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. तिने आठवणींच्या जगाचा एक फेरफटका मारला आणि तिच्या 'नाना' सोबतचा तिचा बालपणीचा फोटो टाकला.

"तू न थकेगा कभी,

तू न रुकेगा कभी,

तू न मुड़ेगा कभी,

कर शपथ, कर शपथ, कर शपथ,

अग्निपथ अग्निपथ अग्निपथ। तुमच्यासारखं कोणी नव्हतं आणि कधीच नसेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा नाना," असे नव्याने पोस्टला कॅप्शन दिले.

बिग बींनी 1969 मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर ते हृषिकेश मुखर्जीच्या आनंद (1971) मध्ये डॉ भास्कर बॅनर्जीच्या भूमिकेत दिसले, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. प्रकाश मेहरा यांच्या अॅक्शन फिल्म जंजीर (1973) ने बच्चन यांना इंडस्ट्रीमध्ये एक स्टार म्हणून स्थापित केले आणि तेव्हापासून ते अष्टपैलू भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत.

त्यांच्या 80 व्या वाढदिवसापूर्वी, ते गुडबाय हा चित्रपट घेऊन आले आहेत, जो सध्या थिएटरमध्ये चालू आहे. आगामी काही महिन्यांत, बिग बी दीपिका पदुकोण आणि प्रोजेक्ट केसोबत द इंटर्न रिमेकमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा -अमिताभच्या ८० व्या वाढदिवसानिमित्य ८० रुपयात थिएटरमध्ये पाहा गुडबाय

ABOUT THE AUTHOR

...view details