महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बिग बींनी श्वानाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना लिहिली भावनिक पोस्ट - बच्चन यांचा कुत्रा मेला

अमिताभ बच्चन यांनी आपल्या पाळीव श्वानाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत एक हृदयद्रावक पोस्ट शेअर केली आहे. एक भावनिक पोस्ट शेअर करताना, बच्चनने एक फोटोदेखील टाकला आहे ज्यामध्ये अमिताभ हे त्यांचा लॅब्राडोरला धरलेले दिसत आहेत.

श्वानाच्या मृत्यूबद्दल अमिताभला शोक
श्वानाच्या मृत्यूबद्दल अमिताभला शोक

By

Published : Nov 16, 2022, 3:05 PM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बुधवारी आपला पाळीव श्वान गमावल्यानंतर एक भावनिक नोट शेअर केली. बिग बी, यांनी आपल्या पाळीव मित्रासोबत जवळचे नाते शेअर केले. त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर श्वानाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी श्वानासोबतचा एक एक फोटो टाकला आहे.

इंस्टाग्रामवर अभिनेत्याने एक फोटो शेअर केला ज्यात त्याने हिंदीमध्ये कॅप्शन दिले, "हमारे एक छोटे से दोस्त ; काम के क्षण ॥ फिर ये बड़े होते हैं ॥ और एक दिन छोड़ के चले जाते हैं ," त्यानंतर एक रडणारा इमोटिकॉन टाकला आहे.

फोटोमध्ये 80 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी त्यांचा लॅब्राडोर धरलेला दिसत आहे. फोटो शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट सेक्शनला मनापासून संदेश आणि तुटलेल्या हृदयाच्या इमोटिकॉन्सने वेड लावले. "पाळीव प्राणी प्रेमाइतकेच मौल्यवान आहेत," अशी एका चाहत्याने कमेंट केली. दुसर्‍या चाहत्याने लिहिले, "आणि ते जे प्रेम देतात ते प्रेमाची शुद्ध आवृत्ती आहे." असे लिहित अमिताभ यांनी त्यांच्या पाळीव श्वानाचे नाव उघड केले नाही.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, अमिताभ बच्चन अलीकडेच दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट उंचाईमध्ये दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, सारिका आणि परिणीती चोप्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, मर्यादित रिलीज मिळूनही या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 10 कोटींहून अधिक कमाई केली. अमिताभ बच्चन आगामी दीपिका पदुकोण आणि दक्षिण अभिनेता प्रभास यांच्यासोबत पॅन इंडिया प्रोजेक्ट के या चित्रपटात आणि द इंटर्नमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा -शुभमन गिलने सारा अली खानसोबतच्या डेटिंगच्या अफवांना दिली हवा, म्हणतो : 'सारा दा सारा सच बोल दिया'

ABOUT THE AUTHOR

...view details