मुंबई - Big B Diwali wishes : दिवाळी सणाचा आनंद अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी साजरा करत आहेत. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या मुंबईतील जलसा बंगल्याच्या आवारात असलेल्या देवघरात जाऊन इश्वर प्रार्थना केली. कुर्ता आणि पायजमा परिधान केलेल्या अमिताभ यांचा प्रार्थना करतानाचा फोटो शोशल मीडियावर झळकला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी आपल्या तमाम चाहत्यांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. एनेक चाहत्यांनीही त्यांना प्रत्युत्तर देत समस्त बच्चन परिवाराला दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन अलीकडेच टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांच्या भूमिका असलेल्या 'गणपथ: अ हिरो इज बॉर्न' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसे होते. कामाच्या आघाडीवर बिग बी आणि रजनीकांत 33 वर्षानंतर एकत्र स्क्रिन स्पेस शेअर करणार आहेत. 'थलैवर 170' या चित्रपटात एकत्र काम करत असून या चित्रपटाचे मुंबईतील शूटिंग पूर्ण झालंय. लायका प्रॉडक्शनने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''जेव्हा सुपरस्टार आणि शहेनशाह 33 यांचं वर्षांनंतर 'थलैवर 170' 33 वर्षांनंतर पुनर्मिलन होतंय. हा चित्रपट दिग्गज कलकारांचा डबल डोस असणार आहे. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांचे मुंबईत सुरू असलेले चित्रपटाचं शेड्यूल पूर्ण झालंय.''
या फोटोत अमिताभ खुर्चीवर बसून हातावर पट्टी बांधून मोबाईल स्क्रीनकडे पाहत असल्याचे दिसतंय. दुसऱ्या फोटो रदजनीकांत अमिताभ जवळ उभा राहून पडद्याकडे बघताना दिसत आहे. 'थलैवर 170' चे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल करत आहेत. हा चित्रपट दोघांच्याही चाहत्यांसाठी बहुप्रतीक्षित असणार आहे.
रितिका सिंग, मंजू वॉरियर, तुषारा विजयन, राणा दग्गुबती आणि फहद फासिल यांनाही एक्स्ट्रा कलाकार म्हणून कास्ट करण्यात आलंय. या चित्रपटात रजनीकांत एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय अमिताभ यांच्याकडे एक साय-फाय अॅक्शन थ्रिलर फिल्म 'कल्की 2898 एडी' आणि कोर्टरूम ड्रामा फिल्म 'सेक्शन 84' देखील आहे.