मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ( Bhumi Pednekar ) पुन्हा एकदा सुपरस्टार अक्षय कुमारसोबत ( Akshay Kumar ) आगामी 'रक्षाबंधन' ( Raksha Bandhan ) या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ती खूप उत्सुक आहे. बुधवारी तिने तिच्या सोशल मीडियावर याबद्दल तिची उत्सुकता व्यक्त केली आहे.
भूमी पेडणेकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अक्षय कुमारला टॅग करीत एक गाणे टाकले. ज्यामध्ये तिने लिहिलंय, अक्षय कुमार सर, आता रक्षाबंधनची वाट पाहत आहे." लगेचच अक्षय कुमारने यावर प्रत्युत्तर देत म्हटले, "प्रतीक्षा लवकरच संपेल भूमी पेडणेकर. काही दिवसांनी भेटू...#रक्षाबंधन"
'टॉयलेट: एक प्रेम कथा' हा भूमीचा 2017 मध्ये अक्षयसोबतचा पहिला एकत्रित चित्रपट होता. भारतात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाला वाहिलेला हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता.