मुंबई : एकता कपूरने आगामी चित्रपट 'थँक यू फॉर कमिंग'ची घोषणा केली आहे. याशिवाय एकताने या चित्रपटाचे एक पोस्टरही सोशल मीडियावर शेअर केले. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये अभिनेत्री स्वत:चा टी-शर्ट काढताना दिसत आहे. ही अभिनेत्री कोण आहे, याचा खुलासा आतापर्यत झालेला नाही. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून एकताने आता स्टारकास्टचा खुलासा केला आहे. 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटात भूमी पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंग, कुशा कपिला, शिबानी बेदी असे कलाकार एकत्र झळकणार आहे. 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटाचे निर्माते एकता कपूर आणि करण बलुनी आहेत.
'थँक्स फॉर कमिंग'चे पोस्टर प्रदर्शित : दरम्यान या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूरचे प्रोडक्शन हाऊस अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क करत आहे. करण बलुनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरवर खूप कमेंट्स येत आहे. आता या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते, या चित्रपटाच्या निर्मात्यांना काही प्रश्न विचारत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शहनाज आहे की भूमी पेडणेकर यामध्ये सध्या कन्फ्यूजन आहे. दरम्यान बरेच वापरकर्ते या फोटोवर अश्लील कमेंट्स देखील करत आहेत. आता या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूप आतुर आहेत.