मुंबई - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या आगामी 'भूल भुलैया 2' या चित्रपटाचा टीझर गुरुवारी प्रदर्शित झाला. हा टीझर कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट 22 मे 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 25 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला.
टिझर शेअर करताना कार्तिकने लिहिले की, 'रूह बाबा येत आहे, मंजुलिका सावधान राहा'. कार्तिक काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेला दिसतो. 53 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यनचा 'बाबा' अवतार दिसतो, त्याच्या बाजूला राजपाल यादव चालताना दिसत आहे. टीझरमध्ये मंजुलिकाची झलकही पाहायला मिळते.
हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे, ज्याचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. बज्मी यांनी यापूर्वी 'रेडी' आणि 'वेलकम' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तब्बूचाही समावेश असलेला हा चित्रपट भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार यांनी टी-सीरीज आणि सिने 1 स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार केला आहे. फरहाद सामजी आणि आकाश कौशिक लिखित 'भूल भुलैया 2' हा चित्रपट निर्माता प्रियदर्शनच्या 2007 मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या याच नावाच्या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
प्रियदर्शन दिग्दर्शित 'भूल भुलैया' हा 1993 मल्याळम चित्रपट मणिचित्रथाझूचा अधिकृत रिमेक होता. या चित्रपटात अमिषा पटेल, परेश रावल, मनोज जोशी, असरानी, राजपाल यादव आणि विक्रम गोखले यांच्याही भूमिका होत्या. 'भूल भुलैया' मधील विद्याचा अभिनय अजूनही प्रतिष्ठित मानला जातो आणि आजपर्यंतच्या तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयापैकी एक मानला जातो.
हेही वाचा -रिहानाच्या अनोख्या मॅटर्निटी फॅशनने इंटरनेटवर खळबळ पाहा फोटो