मुंबई - पंधराएक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैय्या’ आजही प्रेक्षकांना आठवतो. या चित्रपटाने हॉरर-कॉमेडी जॉनरला संजीवनी दिली होती. “मी पाहिलेला पहिला हॉरर-कॉमेडी चित्रपट म्हणजे ‘भूल भुलैय्या’. मला अजूनही तो आठवतो. आणि या फ्रँचायझी मधील दुसऱ्या भागात चक्क मीच काम करतेय हे स्वप्नवत वाटतंय”, असे चित्रपटाची हिरॉईन कियारा अडवाणी म्हणाली. तुला विद्याची भूमिका पुनरुत्थित करताना दडपण आलं होत का असे विचारल्यावर कियारा उत्तरली, “सर्वात महत्वाचं म्हणजे ‘भूल भुलैय्या २’ हा पहिल्या भागाचा रिमेक नाहीये. निर्मात्यांनी एका हिट चित्रपटाची फ्रँचायझी पुढे नेण्यासाठी नावाचा वापर केला असला तरी या दुसऱ्या भागाचे कथानक पूर्णतः वेगळे आहे परंतु जॉनर मात्र हॉरर-कॉमेडीचा आहे. विद्याजी एक अप्रतिम अदाकारा आहे आणि मी त्यांची चाहती देखील आहे. माझी त्यांच्याशी तुलना होऊच शकत नाही. अर्थातच आम्हा दोघींमध्ये ‘मंजुलिका’ कॉमन आहे.”
‘भूल भुलैय्या २’ :अक्षय आणि विद्या बरोबर तुलना केल्यावर कार्तिक आणि कियाराने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!
अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा भुलै भुलैय्या हा चित्रपट १५ वर्षापूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होण्यासाठी सज्ज झालाय. यात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. त्यांची तुलना अक्षय आणि विद्या बरोबर तुलना केल्यावर कार्तिक आणि कियाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भूल भुलैय्या २