मुंबई - Bigg Boss 17 : अभिनेता सलमान खानचा शो 'बिग बॉस 17'ला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या शोमध्ये रोजच भांडणं पाहायला मिळतात. मुनावर फारुकी बिग बॉसचा कॅप्टन झाल्यामुळं अंकिता लोखंडे खूप आनंदी होती, मात्र मुनावरचं तिला शिक्षा देणारा पहिला असेल याची कल्पना अंकितानं केली नसेल. 'बिग बॉस 17'मध्ये नुकतीच अंकिताची तब्येत बिघडली होती. याबाबत अंकितानं बाहेर डॉक्टरांना तिच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. दरम्यान या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोममध्ये बिग बॉस म्हणतात की, ''मी मुनावर एक ऑडिओ क्लिप ऐकवतो, जी आजपर्यंत प्रेक्षकांनी किंवा या भागातील इतर कोणत्याही सदस्यानं ऐकली नाही. यानंतर मुनावर ऑडिओ काळजीपूर्वक ऐकतो. बिग बॉस या ऑडिओवर म्हणतात की, ''तुला मुनावर हे योग्य वाटतं का?'' यावर मुनावर म्हणतो,'' अंकिताला अशा सुविधा दिल्या जात असेल तर हे अयोग्य आहे''.
मुनावर घेतो अंकिताचा क्लास :प्रोमोमध्ये मुनावर पुढं म्हणतो, ''विकी भाई, अंकिता लोखंडे, तुमच्याकडे मेडिकलसाठी येणारे कोणीही असतील, तुम्ही त्यांच्याशी काहीही बोलू शकत नाही आणि हे योग्य नाही. त्यानंतर अंकिता विचारते मी काय बोलले? यावर मुनावर म्हणतो ''मी सर्व ऐकले आहे आणि म्हणूनच मी बोलत आहे''. यानंतर अभिषेक म्हणतो की, ''मला हे प्रकरण काय आहे ते दाखवण्यात आले नाही, त्यामुळं माझा यावर विश्वास बसत नाही''. हे अन्यायकारक असल्याचं बाकी घरातील इतर सदस्यही म्हणतात. यावर अंकिता रडते. तिला विकी शांत करतो. मुनावर आता अंकिताला काय शिक्षा देणार हे आगामी भागात समजेल.