मुंबई- भैय्याजी सुपरहिट आणि सेकंड हँड हसबंड यांसारख्या चित्रपटांमध्ये अखेरची दिसलेली अभिनेत्री आणि क्रिकेटपटू हरभजन सिंगची ( wife of cricketer Harbhajan Singh ) पत्नी गीता बसरा ( Geeta Basra ) आगामी नोटरी ( Notary ) या चित्रपटाद्वारे सहा वर्षांनी पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
ती प्रख्यात बंगाली अभिनेता परमब्रत चॅटर्जी यांच्यासोबत ( Bengali actor Parambrata Chatterjee ) भूमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन वडेयर यांनी केले असून ऑक्टोबरपासून याचे शुटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
गीता बसरा ही प्रेग्नंसीच्या सुट्टीवर होती आणि दुबईमध्ये तिच्या कुटुंबासोबत सुट्टी घालवत होती. यावेळी ती म्हणाली होती, ''ही एक अविश्वसनीय ट्रिप होती, आम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला. भज्जीच्या बिझी वेळापत्रकामुळे आणि हिनायाच्या शाळेमुळे मला अभिनय फार कमी वेळा करायला मिळतो आणि आता आगामी चित्रपटात अशी संधी कधी मिळेल हे माहीत नाही.''