महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Bhai dooj 2023: सारा अलीनं भाऊ इब्राहिमला कोलाजसह दिल्या शुभेच्छा, कंगना रणौतनं शेअर केला मजेशीर किस्सा - कंगना रणौत भाऊबीज

भाऊबीजेच्या सणानिमित्त अभिनेत्री सारा अली खान आणि कंगना रणौत यांनी त्यांच्या भावांसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यांनी भावांसोबतचे फोटो शेअर करुन त्यांच्यासोबतच्या आठवणीही शेअर केल्या आहेत.

Bhai dooj 2023
सारा अली खान आणि कंगना रणौत

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 3:50 PM IST

मुंबई - दिवाळीत येणारा भाऊबीजेचा दिवस तमाम बहिणींसाठी एक आनंदाचा दिवस असतो. आज बुधवारी हा सण देशभर अतिशय उत्साहात साजरा होतोय. महाराष्ट्रात भाऊबीजेच्या सणाला बहिणी भावासाठी दीर्घायुष्य चिंततात आणि त्यांचं औक्षण करतात. उत्तरेकडे हा सण भाईदूज या नावानं साजरा होतो. या सणाच्या निमित्तानं बॉलिवूडच्या अनेक नायिकांनी आपल्या भावासाठी प्रार्थना केलीय. यामध्ये कंगना रणौत आणि सारा अली खाननं आपल्या भावांसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. या खास दिवशी सुंदर संदेशासह भावासोबतचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

सारा अलीनं भाऊ इब्राहिमला कोलाजसह दिल्या शुभेच्छा

देशभरात साजऱ्या होणाऱ्या भाईदूजच्या मुहूर्तावर बहिणींनी आपल्या भावांच्या कपाळावर टिका लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या सणाला गेल्या काही वर्षांत उत्साहानं आपलं बनवलंय. अभिनेत्री सारा अली खान आणि कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी भावासोबतच्या फोटोंसह आपलं प्रेम व्यक्त केलं.

सारा अली खान नेहमीच तिचा भाऊ इब्राहिम अली खानशी घट्ट नातेबंध शेअर करते. इंस्टाग्राम स्टोरीजवर सारा अली खाननं भाईदूजेला इब्राहिम अली खानबद्दलचे आपले प्रेम फोटोंचा एक आनंददायी कोलाज शेअर करून व्यक्त केलंय. या फोटोत दोघांनी एकत्रित घलवलेल्या आनंदी क्षणांचाही तिनं समावेश केलाय.

कंगना रणौतनं शेअर केला मजेशीर किस्सा

दरम्यान, कंगना राणौतनं तिची बहीण रंगोली चंदेल आणि त्यांच्या तीन लहान भावांसोबतचा एक ग्रुप फोटो शेअर केलाय. बालपणीच्या दिवसांची आठवण करून देत कंगनानं त्यांच्यासाठी एक आनंददायी चिठ्ठी लिहिलीय. ट्विटरवर कंगनानं लिहिले: ''तीन छोटे भाई पाकर धन्य हूं, बचपन में एक समोसा लायेगा एक चाय बनायेगा और एक मम्मी को शिकयत लगायेगा फिर उस एक की वजेह से तीनो मार खायेगा...'' अशी मिश्किल कॅप्शन तिनं पोस्टला दिलीय आणि ही शिकवण कधीही विसरु नका असा सल्लाही दिलाय.

सारा आणि इब्राहिम यांनी देखील एकत्र दिवाळीचा सण साजरा केला. तिच्या घरी एक छोटेखानी गेट टुगेदरचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये त्यांची आई अमृता सिंग त्यांच्यासोबत सामील झाली. या तिघांनी पांढर्‍या आणि सोनेरी रंगाच्या पोशाखात सुंदर संयोजन केलं. शिवाय या भावंडांनी करीना कपूर खानच्या दिवाळी सेलिब्रेशनसाठीही हजेरी लावली होती. यामध्ये नीतू कपूर, आलिया भट्ट, करिश्मा कपूर, सैफ अली खान आणि इतर नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.

कामाच्या आघाडीवर सारा अली खान आगामी 'मेट्रो इन दिनो'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बसू करत आहेत. दुसरीकडे, कंगना राणौत अलीकडे तेजसमध्ये झळकली होती. हा चित्रपट फारसा चालला नाही. आता ती आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा -

1. Nana Patekar slaps fan : नाना पाटेकरनं चाहत्याच्या कानाखाली वाजवली, व्हिडिओ व्हायरल

2.IND vs NZ Semifinal : रजनीकांत ते बिग बी; भारत-न्युझीलंड उपांत्य सामन्याला 'हे' दिग्गज सेलिब्रिटी सामन्याला लावणार हजेरी

3.Tiger 3 box office: सलमान आणि कतरिनाच्या 'टायगर 3' ची तिसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिवाळी

ABOUT THE AUTHOR

...view details