मुंबई - बहुप्रतीक्षित मेरी ख्रिसमस १२ जानेवारीला रिलीज होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन यांनी मुंबईत बुधवारी झालेल्या विशेष स्क्रिनिंगला उपस्थित राहून चित्रपटाचा आनंद घेतला.
या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनानंतर या चित्रपटाबद्दलच्या चर्चेला आणखी जोर आला आहे. या चित्रपटातील विजय सेतुपती, कतरिना कैफ, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे या महत्त्वाच्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांना समाधानी करण्याचं काम केल्याची सकारात्मक चर्चा आहे.
मेरी ख्रिसमसचा पहिला आढावा आता नेहा धुपियानं शेअर केला आहे. तिने कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्यासमवेत स्क्रिनिंगमध्ये पाहिलेल्या चित्रपटाचं मूल्यांकन करणारी पोस्ट केली आहे. चित्रपटात विजय सेतुपतीने उत्कृष्ट कामगिरी केली असून कतरिना कैफच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल तिचं कौतुक केलं आहे. मेरी ख्रिसमस चित्रपटाचे निर्माते श्रीराम राघवन यांचंही तिनं कौतुक केलं. नेहानं कतरिना, विजय आणि श्रीराम राघवन यांना समर्पित तिच्या सोशल मीडिया हँडलवर तीन इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या.