हैदराबाद: 'किंग खान'चे लाखो चाहते बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'पठाण' (Pathaan movie) चित्रपटाची वाट पाहत आहेत, मात्र त्याआधीच शाहरुखने चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. शाहरुख, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांसारख्या बडे स्टार्स असलेला 'पठाण' या चित्रपटाचे पहिले गाणे 'बेशरम रंग' रिलीज होणार आहे. खुद्द शाहरुखने एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. हे गाणे कधी आणि कोणत्या वेळी रिलीज होणार हे शाहरुखने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. हे गाणे विशाल-शेखर या प्रसिद्ध संगीतकार जोडीने संगीतबद्ध केले आहे. (Shahrukh, Deepika Padukone and John Abraham starrer 'Pathan' will release its first song Besharam Rang)
Pathaan Movie Song : पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' गाणे लवकरच होणार रिलीज, दीपिकाचा सिझलिंग अवतार पाहायला मिळणार... - Shahrukh Khan
शाहरुख खानने एका पोस्टमध्ये सांगितले आहे की, 'बेशरम रंग' चित्रपटाचे पहिले गाणे कधी रिलीज होणार आहे. या गाण्यात दीपिका पादुकोणचा सिझलिंग अवतार पाहायला मिळणार आहे. कारण शाहरुख खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिका पदुकोण क्रीम रंगाच्या चमकदार बिकिनीत कहर करताना दिसत आहे. हे गाणे बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचे पोस्टरवरून दिसते. (Song Besharam Rang)
गाणे कधी आणि किती वाजता रिलीज होणार? :शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर 'पठाण'चे पहिले रोमँटिक गाणे 'बेशरम रंग' (Besharam Rang song) कधी आणि कोणत्या वेळी रिलीज झाले हे शाहरुख खानने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. हे गाणे 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रदर्शित होणार आहे. या गाण्यात दीपिका पादुकोणचा सिझलिंग अवतार पाहायला मिळणार आहे. कारण शाहरुख खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिका पदुकोण क्रीम रंगाच्या चमकदार बिकिनीत कहर करताना दिसत आहे. हे गाणे बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचे पोस्टरवरून दिसते.
'पठाण' कधी रिलीज होणार? :शाहरुख खान चार वर्षांनंतर त्याच्या चित्रपटात अभिनेता म्हणून दिसणार आहे. शाहरुख शेवटचा 'झिरो' (2018) चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्यानंतर शाहरुखने ब्रेक घेतला. आता शाहरुख खान दमदार शरीरयष्टी करून 'पठाण' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर धमाकेदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट यशराज बॅनरखाली बनला असून चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.