मुंबई- 'किंग खान'चे लाखो चाहते बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'पठाण' या चित्रपटाची वाट पाहत आहेत, मात्र त्याआधीच शाहरुखने चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. शाहरुख, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' हे पहिले गाणे १२ डिसेंबरला रिलीज झाले आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याची माहिती खुद्द शाहरुखने एका पोस्टद्वारे दिली होती. हे गाणे विशाल-शेखर या प्रसिद्ध संगीतकार जोडीने संगीतबद्ध केले आहे. शाहरुख-दीपिकाने या गाण्यात रंगत आणली आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण'चे पहिले रोमँटिक गाणे 'बेशरम रंग' 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता रिलीज झाले आहे. या गाण्यात दीपिका पदुकोणचा सिझलिंग अवतार पाहायला मिळत आहे. गाण्यात दीपिका हॉट बिकिनी आणि मोनोकिनी परिधान करताना दिसत आहे. त्याचबरोबर शाहरुख खानही त्याच्या मस्त अंदाजात दिसत आहे. हे गाणे शिल्पा आणि कुमार यांनी गायले आहे. विशाल-शेखरने त्यांच्या संगीताने सजवले आहे. 'बेशरम रंग' हे गाणे 'हमने तो लूट लिया मिलाक हसन वाले ने' या गाण्याची आठवण करून देते. गाण्यात दीपिका आणि शाहरुख खानची जोडी अप्रतिम दिसत आहे.