महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बेशरम रंग गाण्याच्या कोरिओग्राफरने उघड केले दीपिका पदुकोणच्या डान्स मूव्हचे रहस्य - पठाण चित्रपटामधील पहिले गाणे

नृत्यदिग्दर्शक वैभवी मर्चंटने पठाण मधील बेशरम रंग गाण्यात दीपिका पदुकोणला शानदार दिसण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. वैभवी म्हणाली की गाण्यात दीपिकाच्या शरीरासह आणि डान्स मूव्हसह किती आरामदायक आहे हे पाहून तिला आश्चर्य वाटले.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 14, 2022, 11:45 AM IST

मुंबई- बेशरम रंग हे पठाण चित्रपटामधील पहिले गाणे रिलीज होताच इंटरनेटवर तापमान वाढवले आहे. याचे कारण म्हणजे दीपिका पदुकोण आणि शाहरुखची केमिस्ट्री आहे असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. यामागे आहे एक अशाच गाण्यांसाठी प्रसिध्द असलेली महिला कोरिओग्राफर वैभवी मर्चंट. अलीकडेच वैभवीने या गाण्यावर दीपिकासोबत काम करण्याबाबतचा खुलासा केला आहे.

हे गाणे सोमवारी रिलीज करण्यात आले, जे विशाल-शेखर यांनी कुमारच्या गीतांसह संगीतबद्ध केले आहे. याचा पेपी ट्रॅक शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यातील केमिस्ट्री दर्शवितो. म्युझिक व्हिडिओची सुरुवात दीपिकाच्या गोल्डन मोनोकिनी जंपमधील व्हिज्युअल्सने होते. यात आपण शाहरुखला बीच शर्टमध्ये पाहू शकतो.

वैभवी मर्चंट ही प्रसिध्द कोरिओग्रफारने आजवर अनेक अभिनेत्रींना पडद्यावर हटके लूक आणि मुव्ह्जसह झळकवले आहे. बंटी और बबली मधील 'कजरा रे' या गाण्यात ऐश्वर्या राय बच्चन, धूम 3 मधील कमली कॅटरिना कैफ ते बेशरम रंग मधील दीपिका पदुकोण. तिने दीपिकासोबत पहिले गाणे करण्याचा अनुभव आणि तिच्या कोरिओग्राफीने ते कसे खास बनवले हे सांगितले आहे. वैभवी म्हणाली की गाण्यात दीपिका तिच्या शरीरासह आणि डान्स मूव्हसह किती आरामदायक आहे हे पाहून तिला आश्चर्य वाटले.

ती म्हणते, "मला तिला अशा प्रकारे सादर करायचं होतं, जे तिला आधी कधीच सादर केलं गेलं नाही. मला वेशभूषेसाठी याचे श्रेय शालीना नाथानीला द्यायलाच हवं. दीपिकाचे तिच्याशी खूप चांगले संबंध आहेत आणि ती तिच्या स्वतःच्या त्वचेत खूप आरामदायक आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. तिने गाणे आपलंस केलं आहे आणि ती प्रत्येक फ्रेममध्ये सुंदर दिसत आहे," असे वैभवी म्हणाली.

ती पुढे म्हणाली, "दीपिकाने बेशरम रंगमध्‍ये ती कशी दिसते आहे ते पाहण्‍यासाठी खूप मेहनत घेतली. तिच्याकडे एक संपूर्ण क्रू होता - आहारतज्ञ, तिचा फिजिकल ट्रेनर आणि शालीनाचे अप्रतिम पोशाख. तिने ज्या पद्धतीने केले ते पाहून मी खूप प्रभावित झाले. तिने ज्या प्रकारे कपडे परिधान करताना सहजतेने वागत होते त्यामुळे मी प्रभावित झाले. आणि त्यामुळेच असे गाणे शूट होऊ शकले. कारण असे कपडे घालून अशा गाण्यासाठी स्टेप्स करणे कठीण झाले असते.''

बेशरम रंगाचे चित्रीकरण स्पेनच्या सर्वात भव्य किनारपट्टीवरील माल्लोर्का, कॅडीझ आणि जेरेझ या शहरांमध्ये झाले. 25 जानेवारी 2023 रोजी तीन भाषांमध्ये रिलीज होणार्‍या आगामी अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात शाहरुख खानने मारण्याचा परवाना असलेल्या बंदूकधारी गुप्तहेराची भूमिका केली आहे.

ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस आणि हॅप्पी न्यू इयर यांसारख्या ब्लॉकबस्टर्समुळे शाहरुख आणि दीपिका ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी ऑन-स्क्रीन जोडी आहे.

हेही वाचा -दीपाली सय्यदचे निर्मितीत पदार्पण, बंजारा भाषेतील चित्रपटाची केली निर्मिती!

ABOUT THE AUTHOR

...view details