हैदराबाद - बेल्लमकोंडा श्रीनिवास आणि नुसरत भरुचा प्रमुख भूमिका असलेल्या 'छत्रपती' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही.व्ही. विनायक यांनी केले आहे. बेल्लमकोंडा आणि नुसरतशिवाय या चित्रपटात भाग्यश्री, शरद केळकर, करण सिंग छाबरा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 12 मे 2023 रोजी रिलीज होणार आहे.
छत्रपती ट्रेलर रिलीज- 'छत्रपती'चा हिंदी रिमेक गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. निर्मात्यांनी मंगळवारी 'छत्रपती'च्या हिंदी रिमेकचा ट्रेलर रिलीज केला. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनवास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.
साऊथ इंडियन मालमसाला असलेला ट्रेलर- छत्रपतीचा ट्रेलर हा टिपीकल साऊथ इंडिया चित्रपटाचा मालमसाला भरपूर वापरलेला अॅक्शन चित्रपट आहे. साऊथ स्टार बेल्लमकोंडा साई श्रीनवास याचे पदार्पण या चित्रपटातून होणार असल्यामुळे निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र ट्रेलर पाहता कथानका फार वेगळे काही असेल असे सध्यातरी दिसत नाही. अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या लौकिकाला शोभेल अशीच ट्रेलरमध्ये दिसत आहे. तिच्या वाट्याला एक ग्लॅमरस भूमिका आली असून यात ती कमाल दाखवताना दिसत आहे.