महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Addison's to Sushmita Sen : ह्रदयरोगाआधी सुष्मिता सेनला झाला होता एडिसन डिसीज, सांगितला थरारक अनुभव - Sushmita Sen suffered a heart attack

सुष्मिता सेनला ह्रदयविकाराचा झटका आला होता. सुष्मितावर अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आल्यानंतर ती आता बरी आहे. यापूर्वी तिने एडिसन या गंभीर आजाराशीही सामना केला होता. त्याप्रसंगीचा थरारक अनुभव तिने सांगितला आहे.

Addison's to Sushmita Sen
Addison's to Sushmita Sen

By

Published : Mar 3, 2023, 1:43 PM IST

मुंबई - अभिनेत्री सुष्मिता सेनला ह्रदयविकाराचा झटका आला होता आणि तिने यासाठी अँजिओप्लास्टी सर्जरी केल्याची बातमी आम्ही आपल्याला काल दिली होती. आता ती यातून बरी होत आहे. दरम्यान ह्रदय विकारा आधी तिला एडिसन डिसीज नावाच्या ऑटोइम्यून कंडिशनचे निदान झाले होते. हा एक त्रासदायक आजार आहे.

सुष्मिता सेनने सांगितला थरारक अनुभव - आपल्यावर गुदरलेली आपबिती सांगताना सुष्मिता सेन म्हणाली, '2014 च्या सप्टेंबरमध्ये एडिसन डिसीज नावाच्या ऑटोइम्यून कंडिशनचे निदान झाल्यानंतर, मला असे वाटू लागले होते की, माझ्यामध्ये कोणतीही लढाई करण्याची शक्ती शिल्लक नाही... प्रचंड निराशा आणि आक्रमकतेने भरलेले थकलेले शरीर बनले होते. माझ्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे तयार झाली होती. या 4 वर्षाच्या काळात मी सहन केलेल्या काळोखाचे स्पष्टीकरण देखील देऊ शकत नाहीत. स्टिरॉइड्सचा पर्याय कॉर्टिसॉल घेणे आहे आणि त्याचे असंख्य दुष्परिणाम सहन करणे हे त्या आजाराचा दंड भरणे आहे. दीर्घ आजाराने जगण्यापेक्षा थकवणारे दुसरे काहीही नाही.', असे सुष्मिता सेनने म्हटलंय.

सुष्मिताने अशी केली एडिसन डिसीजवर मात - अभिनेत्री सुष्मिताने तिच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की ननचाकू, पारंपारिक आशियाई मार्शल आर्ट फॉर्मसह ध्यानधारणा करण्यासारख्या गोष्टी तिला या आजाराचा सामना करण्यास मदतकारक ठरल्या आहेत. आपल्याला हा आजार का झाला असेल यावर तिने बरेच आत्मचिंतनही केले आि आगामी काळात कशी दक्षता घेता येईल यावर लक्ष केंद्रित केले. तिने एका नामवंत मॅगझिनसाठी लिहिलेल्या एका आर्टिकलमध्ये, तिने सांगितले की निदान झाल्यामुळे तिला तिच्या आयुष्याचे पुनर्मूल्यांकन करता आले. तिने ज्या गोष्टींचा सामना केला होता, त्यापैकी तिची तब्येत ही एक गोष्ट होती ज्याने तिला हादरवून सोडले होते. तिने असेही जोडले की एडिसनच्या आजाराने ग्रस्त होणे खूपच क्लेशकारक होते.

तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतोपुढे सविस्तर माहिती देताना, ती पुढे म्हणाली की स्टिरॉइडवर अवलंबून राहण्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो, परंतु ती सर्वोत्तम वैद्यकीय मदत मिळवण्याच्या स्थितीत होती आणि जे करणे आवश्यक आहे ते करण्यासाठी ती देवाची आभारी आहे. तथापि, यामुळे तिला प्रश्न पडला की ती हे जास्त काळ टिकवून ठेवू शकेल का, तिच्या मुलांवर आणि तिच्या जबाबदाऱ्यांवर कसा परिणाम होईल. त्यातून तिला अनेक प्रश्न पडले आणि यामुळे आरोग्य ही संपत्ती कशी असते याची जाणीव झाली.

हेही वाचा -International Women's Day 2023 : महिला दिन विशेष, 'हे' आहेत उत्कटतेने आणि शक्तीने भरलेल्या महिलांवर आधारित चित्रपट; पहा...

ABOUT THE AUTHOR

...view details