मुंबई : आरआरआर स्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कमिनेनी कोनिडेला लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाच्या दहा वर्षानंतर पहिल्यांदा हे जोडपे पालकत्व स्वीकारणार आहेत. या बातमीमुळे राम चरणचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार फार आनंदी आहे. या जोडप्याला त्यांच्या कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून शुभेच्छा मिळत आहे. राम चरण आणि उपासना नवीन प्रवास सुरू करण्याच्या तयारीत असताना, या जोडप्याला सुनीता कृष्णन, यांनी एक खास भेट दिली आहे. सोशल मीडियावर उपासनाने एक मॉन्टेज व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओद्वारे तिने प्रज्वला फाऊंडेशनच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असल्याबद्दल, पाळणाबद्दल आभार मानले आहे. प्रज्वला फाऊंडेशनद्वारे लैंगिक तस्करी थांबत असल्याचे तिने उल्लेख केला. उपासना या फाउंडेशनसोबत खूप दिवसांपासून काम करत आहे.
राम चरण आणि उपासनाच्या घरी हलणार पाळणा :हा व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहले, प्रज्वला फाऊंडेशच्या अतुलनीय तरुणींकडून ही मनापासून भेट मिळाल्याबद्दल आम्ही सन्मानित आणि नम्र आहोत. हा हेन्डमेड पाळणा खूप महत्त्वाचा आहे, जो शक्ती, लवचिकता आणि आशा यांचे प्रतीक आहे. हे परिवर्तन आणि स्वतःचा प्रवास दर्शवते. माझ्या मुलाने जन्मापासूनच यासाठी समोर यावे अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर तिने सुनीता कृष्णन यांना ही पोस्ट शेअर केली आहे. राम चरण आणि उपासना यांनी एक दशकाहून अधिक काळ आई-वडील होण्याची वाट पाहिली या जोडप्याने 12 डिसेंबर 2022 रोजी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. सुपरस्टार राम चरणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.