महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

BBD Box Office : बाईपण बॉक्स ऑफिसवर बेलगाम, चौथ्या आठवड्यातही हाऊसफुल्ल - बाईपण भारी देवा एकूण बॉक्स ऑफिस कमाई

बाईपण भारी देवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बेलगाम सुरू आहे. पहिल्या आठवड्याहूनही तिसऱ्या आठवड्याची कमाई जबरदस्त झाली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने उचलून धरल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसत आहे.

BBD Box Office
बाईपण बॉक्स ऑफिसवर बेलगाम

By

Published : Jul 21, 2023, 5:40 PM IST

मुंबई - बाईपण भारी देवा चित्रपट ब्लॉकबस्टर बनला असून रिलीजच्या चौथ्या आठवड्यातही शो हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. तीन आठवड्यांच्या एकूण कमाईचे आकडे समोर आले असून चित्रपट बेलगामपणे सुसाट धाव घेत आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई १ कोटी इतकी होती. तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस सिनेमाने तब्बल ५९.५९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

बाईपण भारी देवा या मराठी चित्रपटाची जादु बॉक्स ऑफिसवर अजूनही कायम आहे. ३० जून रोजी रिलीज झालेला हा चित्रपटाने चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. तिसऱ्या आठवड्याची कमाई पहिल्या आठवड्याहून जास्त होती. तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी २,४० कोटी, शनिवारी ५.०५ कोटी, रविवारी ६.०५ कोटी, सोमवारी २.१५ कोटी, मंगळवारी २.१० कोटी, बुधवारी २,०५ कोटी आणि गुरुवारी १.४४ कोटी अशी दैनंदिन कमाई झाली. आतापर्यंत चित्रपटाने ५८.५९ कोटी इतकी एकूण कमाई केली आहे.

बाईपण भारी देवाच्या एकूण बॉक्स ऑफिस कमाईवर एक नजर टाकूयात...

पहिला आठवडा १२.५० कोटी

दुसरा आठवडा २४.८५ कोटी

तिसरा आठवडा २१.२४ कोटी

बाईपण भारी देवाला मिळत असलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांचा सारखाच प्रतिसाद सिनेमाला मिळतोय. तालुक्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या चित्रपटासाठी ग्रामीण भागातील महिला भाड्याच्या गाड्या करुन सहलीला किंवा यात्रेला यावे तशा येताना दिसतात. या चित्रपटाचे वैशिष्य म्हणजे थिएटरमध्ये उपस्थित प्रेक्षकांमध्ये महिला प्रेक्षकांचा सर्वाधिक भरणा असतो. ग्रामीण भागात इतका प्रतिसाद फार पूर्वी माहेरची साडी चित्रपटाला मिळाला होता. शहरातही हेच चित्र असून महिला पार्टीला जातात त्या प्रमाणे नटून थटून चित्रपटगृहात येताना दिसतात. एखादा चित्रपट प्रेक्षक जेव्हा उचलून धरतात तेव्हा काय घडू शकते याचे प्रत्यंतर बाईपण भारी देवा चित्रपट पाहताना दररोज येत आहे. साधारणपणे दक्षिणेत अशी चित्रपटांपर्ती क्रेज प्रेक्षकांमध्ये दिसून येते. आपल्याकडे काही वर्षापूर्वी सैराट, नटसम्राट आणि वेड चित्रपटाच्या निमित्तानेही याचा अनुभव आला होता. मराठी चित्रपटाला हे गतवैभव बाईपण भारी देवाने परत मिळवून दिले आहे.

हेही वाचा -

१.Ranveer Singh : मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये रणवीर सिंगने पत्नी दीपिका पदुकोणचे घेतले चुंबन

२.anupam kher : अनुपम खेर आणि जया बच्चन यांनी मणिपूर हिंसाचारवर व्यक्त केला आपला संताप...

३.Alia Bhatt : भविष्यात राहा कपूर काय बनणार? आलिया भट्टने दिले भन्नाट उत्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details