मुंबई : मंगळवारी वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'बवाल'च्या निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित केले होते. 'बवाल'च्या स्क्रीनिंगसाठी अनेक कलाकर यावेळी उपस्थित होते. यावेळी सिल्व्हर सिक्विन गाऊनमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. या लूकवर तिने कमीत कमी मेकअप केला होता. स्क्रिनिंगला जाण्यापूर्वी जान्हवीने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. दुसरीकडे, वरुणने पांढऱ्या रंगाचे स्टायलिश शर्ट परिधान करून यावर त्याने एक ब्रेझर्स घातला होता. या खास दिवशी तो आपल्या पत्नी नताशा दलालसोबत आला होता. यावेळी अनेक कलाकार 'बवाल' चित्रपटाच्या टीमला चिअर करत होते.
'बवाल'च्या स्क्रिनिंगसाठी बॉलिवूडमधून कोणकोण आले : 'बवाल'च्या स्क्रिनिंगसाठी बॉलिवूडमधून करण जोहर, अर्जुन कपूर, खुशी कपूर, बोनी कपूर, नोरा फतेही, तमन्ना भाटिया , मनीष मल्होत्रा, एली अवराम, पूजा हेगडे, नुश्रत भरुच्चा, अवनीत कौर आणि इसाबेल हे कलाकर आले होते. या कलाकरांनी 'बवाल'च्या टिमला पाठिंबा दर्शविला. तसेच वरुणचे वडील डेव्हिड धवनही यावेळी स्क्रिनिंगला उपस्थित होते.
मुंबईत बावलच्या स्क्रिनिंगमध्ये खुशी कपूर :'बवाल' या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेला एक रोमँटिक ड्रामा आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दुबईमध्ये लाँच करण्यात आला होता. या चित्रपटात वरुण एका इतिहास शिक्षकाची भूमिका रूपेरी पडद्यावर साकारत आहे. 'बवाल' चित्रपटाची शूटिंग पॅरिस, बर्लिन, पोलंड, अॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा यासह लखनौ आणि भारतातील इतर दोन शहरांमध्ये झाले आहेत. चित्रपटाच्या क्रूमध्ये ७०० पेक्षा जास्त लोक होते. या चित्रपटात जर्मनीहून आलेले स्टंटमॅन देखील होते.
'बवाल' चित्रपटाबद्दल : नितेश यांनी चित्रपटाबाबत खुलासा करताना सांगितले, 'हा चित्रपट फक्त हिटलरबद्दलच नाही, अशा अनेक गोष्टीबाबत आहे ज्या कदाचित तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिल्या नसतील, आणि प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना काळजीपूर्वक घेतली गेली आहे ज्याचा एकंदर परिणाम होऊ शकतो.'त्याने पुढे सांगितले, 'दुसरे महायुद्ध प्रचंड भयानक होते, तुम्हाला माहिती आहे, तेथे बरेच काही घडले होते. या चित्रपटात अशा गोष्टी दाखविण्यात आल्या आहे की, ज्या पात्रांच्या प्रवासावर परिणाम करणाऱ्या असेल'. 'जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते यावर माझा ठाम विश्वास बसू लागला आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल की माझ्यासोबत असे का झाले आहे. पण नंतरच्या टप्प्यावर जीवन तुम्हाला जो पर्याय देतो तो खूप मोठा ठरतो'. असे त्याने सांगितले. 'बवाल' हा चित्रपट २१ जुलै रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
- Umesh Kamat and Priya Bapat : 'नवा गडी नवं राज्य'च्या दशकपूर्तीनंतर उमेश कामत आणि प्रिया बापट नवीन नाटकात पुन्हा एकत्र
- Mission Impossible 7 box office day 7: मिशन इम्पॉसिबल ७ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पार केला ७० कोटीचा आकडा...
- Kiara Advani and Sidharth Malhotra : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राला मुंबई विमानतळावर पापाराझीने केले स्पॉट...