मुंबई :बॉक्स ऑफिसवर या आठवड्यात बॉलीवूड आणि हॉलीवूड चित्रपटांमध्ये लढत आहे. ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट 'ओपेनहायमर' आणि ग्रेटा गेरविगचा चित्रपट 'बार्बी' बॉक्स ऑफिसवर आधीच राज्य करत आहेत, पण आता भारतात या दोन्ही चित्रपटांना स्पर्धा देण्यासाठी करण जोहरचा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटगृहात दाखल झाला आहे. २१ जुलै रोजी रिलीज झालेला 'ओपेनहायमर' भारतातील १०० कोटी क्लबच्या अगदी जवळ पोहोचला आहे, तर 'बार्बी' चित्रपटाने देखील जगभरात यशाचे डोंगर गाठले आहे. बॉक्स ऑफिसवर सर्व चित्रपटांचा वीकेंड कसा गेला, संपूर्ण रिपोर्ट येथे वाचा.
'ओपेनहायमर' चित्रपटाची कमाई : ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपेनहायमर' हा चित्रपट जगभरात कमाईच्या बाबतीत 'बार्बी'पेक्षा मागे पडला असेल, पण भारतात हा चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. 'ओपेनहायमर'ने रविवारी एका दिवसात हिंदीत ७३ लाखांचा व्यवसाय केला, तर इंग्रजीमध्ये या चित्रपटाने एका दिवसात ६.५६ कोटींची कमाई केली. हिंदी भाषेतील चित्रपटाचे एकूण कलेक्शन आतापर्यंत १०.५३ कोटींवर पोहोचले असून इंग्रजीमध्ये चित्रपटाने एकूण ८१ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन आतापर्यंत ९२.०९ कोटी इतके झाले आहे.