मुंबई : सध्या चित्रपटसृष्टीत बायोपिक्सची लाट आहे. भारतातील कानाकोपऱ्यातील अनेक सत्यकथा आणि खऱ्याखुऱ्या माणसांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनू लागलेत. बायोपिक बनविताना प्रमुख भूमिकेसाठी कलाकार निवडताना बरीच मेहनत घ्यावी लागते. तसेच सिलेक्ट झालेल्या कलाकाराला देखील ती भूमिका साकारताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. महत्वाचे म्हणजे ‘बैंडिट शकुंतला’ मध्ये स्वतः बैंडिट शकुंतला प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अशा प्रकारची घटना जागतिक सिनेमातही अपवादानेच आढळेल.
चित्रपटाची तोंडभरून प्रशंसा :आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी या चित्रपटाची तोंडभरून प्रशंसा केली. चित्रपटाचे दिग्दर्शक हैदर काझमी आणि निर्माते लियाकत गोला यावेळी उपस्थित होते आणि आपल्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळं भारावून गेले होते. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषांत असून ‘बैंडिट शकुंतला' च्या इंग्रजी अवताराचे प्रदर्शन फ्रांस मधील २०२३ च्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे. हा चित्रपट मधुबनी या प्रदेशातील डाकू शकुंतला माहतो हिच्या आयुष्यातील खऱ्या घटनांवर आधारित असून त्याचे कथानक ग्रामीण भारतातील स्त्रियांच्या अत्याचाराच्या विरोधात बदला, बहादुरी, प्रेम, दुःख, द्वेष, जाति, राजकीय शक्ती आणि अन्यायांच्या विरोधातील लढ्याचे आहे. या चित्रपटात शकुंतला माहतो व्यतिरिक्त हैदर काझमी, ओमकार दास मणिकपुरी, प्रतिभा यशपाल शर्मा आणि अभिमन्यू सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
आशावाद कायम ठेवला :शकुंतलाचा जन्म बिहार मधील खालच्या जातीतील घरातला. अत्यंत गरिबीत तिचे सुरुवातीचे जीवन गेले. तसेच जातीवाचक शिव्या आणि सतत अपमानित व असहाय जीवन ती जगत होती. हे कमी नव्हे तर तिच्यावर वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी बलात्कार करण्यात आला. या सर्व अन्यायाविरोधात तिने लढायचे ठरविले आणि ‘बैंडिट शकुंतला' चा जन्म झाला. अर्थातच या सगळ्याबरोबरच तिच्या आयुष्यातील भावनिक क्षणांचे चित्रणही करण्यात आले असल्यामुळे चित्रपटाची उंची वाढली आहे. तिला तुरुंगवास भोगावा लागला तोही न्यायालयीन लढाईशिवाय परंतु तिने आशावाद कायम ठेवला आणि आपले जीवन आपल्यासारख्याच गरीब आणि असहाय लोकांसाठी व्यतीत करण्याचे ठरविले. तिच्यावर शासनाने तब्बल ४५ गुन्हे दाखल केले परंतु त्यातील एकही केसमध्ये तिला शिक्षा होऊ शकली नाही आणि त्याचे कारण होते तिच्यावरील आरोप सिद्ध न होणे.
दिग्दर्शनाची धुरा सांभाळली :‘बैंडिट शकुंतला' ची निर्मिती लियाकत गोला, उपेंद्र कुमार पिंटू कुमार आणि श्रावण प्रसाद यांनी केली आहे. डायमेन्शन्स एएससी, डिजिटल एलएलपी आणि युपीजे फिल्म्स प्रॉडक्शन्स या बॅनर्सखाली दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हैदर आझमी यांनी तर असोसिएट डिरेक्टर आहेत. प्रीती राव कृष्णा संकुलाची जबाबदारी पार पाडलीय बल्लू सलुजा यांनी यावर्षी येत्या जूनमध्ये ‘बैंडिट शकुंतला' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :Tiger Shroff Birthday : दिशा पटानीने एक्स बॉयफ्रेंड टायगर श्रॉफला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाली...