मुंबई - पानिपतच्या पराभवांनंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी अनुभवलेल्या भयाण वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट ‘बलोच’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी करणारा धगधगता चित्रपट म्हणजे 'बलोच'. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटात प्रवीण तरडे यांची प्रमुख भूमिका असून कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे.
पोस्टरमध्ये बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे दिसत आहेत. या सर्वांमध्ये प्रवीण तरडे यांची करारी मुद्रा सर्वांच्या नजारा खिळवून घेणारी आहे. त्यांच्या डोळ्यांतील धगधगणारी आग अनेक भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता 'बलोच'च्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासातील आठवणींना उजाळा मिळणार आहे.