मुंबई: 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर सध्या चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटात हिरो आणि हिरोईन नसताना हा चित्रपट दमदार कमाई बॉक्स ऑफिसवर करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी महिला प्रेक्षक तुडुंब गर्दी करत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट जेवढा भारतात कमाई करत आहे तेवढाच जगभर देखील कमाई करत आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बुधवारी २०व्या दिवशी १.८५ कोटी कमाविले असून या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५७.२० कोटीपर्यत पोहचले आहे. या चित्रपटाने १०व्या दिवशी ६.६ कोटीची कमाई केली होती.
'बाईपण भारी देवा': मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या १०-१५ वर्षांत एकापेक्षा एक उत्तम चित्रपट प्रदर्शित होत असल्याने आता मराठी चित्रपटसृष्टी मोठी भरारी घेत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील असे चित्रपट आहे ज्यांनी बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली या चित्रपटामध्ये दुनियादारी, सैराट, धर्मवीर, पावनखिंड, वेड, चंद्रमुखी, लय भारी या चित्रपटांनी खूप कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. आजही मराठीतला सर्वाधिक कमाईचा विक्रम 'सैराट' चित्रपटाच्या नावावर आहे. या पुर्वी रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटाने खूप जबरदस्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. आता 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट किती कमाई करेल हे काही दिवसात कळेल . हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, दुबई या देशांमध्येही चित्रपट प्रदर्शित झाला. निम्म्याहून अधिक चित्रपटगृहांतले शोज हाऊसफुल आहेत.