मुंबई :आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे-स्टार कॉमेडी 'ड्रीम गर्ल 2'ला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या रविवारी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा आकडा पार केला. आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2'ने पहिल्या दिवशी 10.69 कोटी रुपये आणि पहिल्या शनिवारी 14.02 कोटी रुपये आणि पहिल्या रविवारी सुमारे 16 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 40.71 पोहचले आहे. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगच्या तिसऱ्या दिवशी सुमारे 1.50 लाख तिकिटे विकली गेली. हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या रक्षाबंधनाच्या सुट्टीमुळे जास्त कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
'ड्रीम गर्ल 2'ची जादू :'ड्रीम गर्ल 2' चित्रपटात आयुष्मान खुराना व्यतिरिक्त अनन्या पांडे, अन्नू कपूर, परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, असरानी, सीमा पाहवा, मनोज जोशी, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी आणि रंजन राज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. 'ड्रीम गर्ल 2' चे तीन दिवसांचे कलेक्शन छान झाले आहे. आयुष्मानला बऱ्याच दिवसांनी बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळत आहे. हा चित्रपट आता लवकरच 50 कोटींचा टप्पा पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट सोमवारी आणि मंगळवारपर्यंत 50 कोटाचा टप्पा पार करेल असे सध्या दिसत आहे.
'ड्रीम गर्ल 2' चे कलेक्शन
पहिल्या दिवस 10.69 कोटी