मुंबई :आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर कॉमेडी-ड्रामा आगामी 'ड्रीम गर्ल २' चित्रपटातील आयुष्मान खुरानाचा फर्स्ट लूक आता समोर आले आहे. निर्मात्यांनी २५ जुलै रोजी चित्रपटामधील आयुष्मानचा पूजा म्हणून पहिला लूक सादर केला आहे. आयुष्मानचा हा चित्रपट २५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाच्या रिलीजच्या महिनाभर आधी आयुष्मान खुरानाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. 'ड्रीम गर्ल २'चे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. आधीच्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते.
आयुष्मान खुराणा दिसणार पुजाच्या अवतारात : दरम्यान यावेळी 'ड्रीम गर्ल २' चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत स्टार किड अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा हा पूर्वीच्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २०१९मध्ये प्रदर्शित झालेला 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटामधील गाणे सुद्धा खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटाची कहाणी खूप हटके असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. दरम्यान आता आयुष्मान लूक हा सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यानंतर युजर या पोस्टवर कमेंट करत आहेत.