महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

P Khurana passed away : आयुष्मान खुरानाला पितृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर पी खुरानांचे निधन - P Khurrana died

अभिनेता आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडिल पी खुराना यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गेली दोन दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5.30 वाजता चंदीगड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

P Khurana passed away
ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर पी खुरानांचे निधन

By

Published : May 19, 2023, 4:26 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे वडील पी खुराना यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना चंदीगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयुष्मानच्या वडिलांचे शुक्रवारी, 19 मे रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5.30 वाजता चंदीगड येथील मणिमाजरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

पी. खुराना यांचे उपचारादरम्यान निधन - पी. खुराना यांच्या निधनामुळे संपूर्ण घरात शोकाकुल वातावरण आहे. ते गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. रग्णालयात ते व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी व्हेंटिलेटरनेही काम करणे बंद केले होते. विशेष म्हणजे आयुष्मानला आज पंजाब विद्यापीठात उपराष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार होते आणि अशावेळी ही दुःखद बातमी आली आहे.

अपारशक्तीने निधनाच्या बातमीला दिला दुजोरा- त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना, पत्नी पूनम खुराना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. निधनाची बातमी पसरल्यानंतर काही तासांनी अपारशक्तीच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन जारी केले. निवेदनात असे लिहिले आहे की, आपल्याला अत्यंत दुःखाने कळविण्यात येत आहे की आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी 10:30 वाजता मोहाली येथे दीर्घकाळ असाध्य आजारामुळे निधन झाले. या वैयक्तिक नुकसानीच्या काळात तुमच्या सर्व प्रार्थना आणि समर्थनासाठी आम्ही आपले ऋणी आहोत.

आयुष्मान खुरानाचे वडील ज्योतिषी विद्या पारंगत- आयुष्मान खुरानाचे वडील ज्योतिषी होते. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतरही ती आपल्या जेतिषी विद्येमध्येच रमले. अत्यंत शिस्तबद्ध असलेल्या पी खुराना यांना संगीत, कविता, चित्रपट आणि कलेची आवड होती. आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांच्यात स्वतःचे नशीब कोरण्याची क्षमता आहे आणि त्यांचे चांगले कर्म कोणत्याही ज्योतिषाला मागे टाकू शकते, असे म्हणायचे. आयुष्मान खुरानाने अनेक मुलाखतीमध्ये वडिलांबद्दल सांगितले होते. त्यांच्या शिस्तीबद्दल तो नेहमी कौतुक करत राहिला. वडिलांच्या कलात्मक दृष्टीकोनामुळेच तो व त्याचा भाऊ कलेच्या क्षेत्रात वावरत असल्याचे त्याने कबुल केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details