महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Dream Girl 2 BO Collection Day 9 : 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर करत आहे जबरदस्त कमाई... - बॉक्स ऑफिस कलेक्शन

Dream Girl 2 BO Collection Day 9 : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. प्रेक्षक पूजाला खूप पसंत करताहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी खूप गर्दी करताहेत.

Dream Girl 2 BO Collection Day 9
ड्रीम गर्ल 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 9

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 1:19 PM IST

मुंबई - Dream Girl 2 BO Collection Day 9 :आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर रोमँटिक ड्रामा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' ला पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या पूजा बॉक्स ऑफिसवर खूप धमाल करताना दिसतेय. पूजाला बघण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होतीय. आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देत असून 'ड्रीम गर्ल 2'चा ओपनिंग वीकेंड हा शानदार होता. हा चित्रपट 'गदर 2'समोर चांगलाच टिकूण राहिला. या चित्रपटाने 4 दिवसात 50 कोटीचा टप्पा ओलांडला होता. आज रिलीजच्या 9व्या दिवशी देखील हा चित्रपट चांगली कमाई करणार असा अंदाज वर्तविला जात आहे. रिलीजच्या 9व्या दिवशी 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे जाणून घेऊया...

'ड्रीम गर्ल 2' चे कलेक्शन :सकनील्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'ड्रीम गर्ल 2' ने शुक्रवारी 4.7 कोटीची कमाई केली आहे. त्यानंतर आता हा चित्रपट शनिवारी जास्त कमाई करू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. हा चित्रपट शनिवारी 6.00 कोटीचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर करेल अशी शक्यता आहे. त्यानंतर यासह 'ड्रीम गर्ल 2' चे कलेक्शन 77.70 कोटी होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलं आहे. 'ड्रीम गर्ल 2'मध्ये आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या व्यतिरिक्त परेश रावल, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर, मनजोत सिंग, राजपाल यादव आणि सुदेश लाहिरी हे कलाकार आहेत. या कलाकरांनी या चित्रपटात खूप जबरदस्त अभिनय केला आहे.

'ड्रीम गर्ल 2'ची कमाई

पहिला दिवस 10.69 कोटी

दुसरा दिवस 14.02 कोटी

तिसरा दिवस 16 कोटी

चौथा दिवस 5.42 कोटी

पाचवा दिवस 5.87 कोटी

सहावा दिवस 7.5 कोटी

ABOUT THE AUTHOR

...view details