Dream Girl 2 Box Office Collection day 10 :आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' रूपेरी पडद्यावर पैसे छाप आहे. 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 4 दिवसात 50 कोटीचा टप्पा ओलांडला होता. 'गदर 2' आणि 'ओएमजी 2' हे मोठे चित्रपट रूपेरी पडद्यावर राज्य करत असताना देखील 'ड्रीम गर्ल 2' चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट लकरच 100 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असे सध्या दिसत आहे. आता देखील 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत आहे.
'ड्रीम गर्ल 2'चे बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन : सॅकनिल्क रिपोर्टनुसार 'ड्रीम गर्ल 2' ने रिलीजच्या 8 व्या दिवशी 4.7 कोटींचा व्यवसाय केला होता, 9व्या दिवशी या चित्रपटाने 6 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 77.70 कोटी रुपये झाले आहे. याशिवाय 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट 10व्या दिवशी 6.71 कोटीची कमाई करू शकेल. यासोबत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 84.73 होईल. आयुष्मान खुरानाचा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.