महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ibrahim Ali Khans debut film : इब्राहिम अली खान बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज, शुटिंग पूर्ण झाल्याचा साराचा खुलासा - Sara Ali Khan

इब्राहिम अली खान चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या पावलावर पाऊल ठेवत लवकरच चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकणार आहेत. इब्राहिमच्या पदार्पणाच्या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्याचा खुलासा त्याची मोठी बहिण सारा अली खानने केला आहे.

Ibrahim Ali Khan's debut film
इब्राहिम अली खान बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

By

Published : May 20, 2023, 1:37 PM IST

मुंबई- अभिनेता सैफ अली खान आणि माजी पत्नी अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो स्टार किड असल्यामुळे पापाराझींच्यामध्ये तो नेहमीच लोकप्रिय आहे. इब्राहिम करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरद्वारे बनत असलेल्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण होत असताना इब्राहिमची मोठी बहीण आणि अभिनेत्री सारा अली खानने चित्रपटाविषयी अपडेट शेअर केले.

भाऊ इब्रहिमच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल सारा अली खानचा खुलासा - या वर्षी कान्समध्ये पदार्पण करणाऱ्या साराने एका मुलाखतीदरम्यान इब्राहिमच्या पदार्पणाच्या चित्रपटाबद्दल सांगितले. इब्राहिमच्या डेब्यू चित्रपटाबद्दल अपडेट शेअर करताना, सारा म्हणाली की तिच्या भावाने सरजमीन असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग आधीच पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी यांनी केले आहे. सरजमीन चित्रटामध्ये काजोल आणि मल्याळम स्टार पृथ्वीराज सुकुमारन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

लहान भावाबद्दल बहिण साराची माया - इब्राहिमसोबतच्या तिच्या बॉन्डबद्दल बोलताना सारा अली खाननने सांगितले की तिला तिच्या लहान भावाबद्दल ममता वाटते. ती म्हणाली, 'तुम्हाला माहिती असेल की त्याने नुकतेच एक अभिनेता म्हणून त्याच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही. तो जेव्हा कधीही घरी परततो, मग ते शाळेतून असो किंवा शूटहून आम्हा दोघीही ( स्वतः आणि तिची आई अमृता ) त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्याबद्दलचा माझा दृष्टीकोन आहे तो आईसारख्या ह्रदयाचा प्रेमळ आहे. कारण आम्ही इब्राहिमशी अगदी सारखे वागतो', असे सारा म्हणाली.

करण जोहरच्या सहाय्यक म्हणून इब्राहिमची सुरुवात - आपल्या डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी इब्राहिमने करण जोहरकडून चित्रपट सृष्टीचे धडे गिरवले. त्याने रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये दिग्दर्शक करण जोहरचा सहाय्यक म्हणून काम केले होते. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा -Sara Ali Khan Runs After Selfie : कान्सहून परतलेल्या सारा अलीला घरी जाण्याची घाई, ऐश्वर्याही आराध्यासह परतली

ABOUT THE AUTHOR

...view details