मुंबई - प्रख्यात दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ( James Cameron ) हॉलिवूड चित्रपट 'अवतार'चा ( Avatar ) सीक्वल 'अवतार द वे ऑफ वॉटर' ( Avatar the Way of Water ) गेल्या १६ डिसेंबरला जगभर रिलीज झाला. या चित्रपटाला जगभरात जबरदस्त प्रतिसाद मिळत असून भारतातही चित्रपट तुफान कमाई करत आहे. सुमारे २१०० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या 'अवतार: द वे ऑफ वॉटर' चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर पहिल्या विकेंडला १६० कोटींची कमाई केली आहे.
ट्रेड विशेषज्ञ रमेश बाला यांनी आपल्या ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
तीन दिवसांत १६० कोटींचा गल्ला : भारतामध्ये ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ ने फक्त दोन दिवसांत १०० कोटींचा पल्ला गाठला ( Avatar Earned 100 Crores In Two Days ) आणि तिसऱ्या दिवशी तब्बल १६० कोटीपर्यंत छप्पार फाड कमाई केली आहे. हा चित्रपटअजून अनेक विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ ने १५०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे. या चित्रपटाला अप्रतिम रिव्ह्यूज मिळाले आहेत. ‘अ व्हिज्युअल ट्रीट’, ‘सुपरसाईज्ड ब्लॉकबस्टर’, ‘अप्रतिम सिनेमॅटिक जर्नी ’ सारख्या कॉमेंट्समुळे सकारात्मक शब्दांची माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. अवतार द वे ऑफ वॉटर’ इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब करण्यात आला आहे.