मुंबई - बहुप्रतिक्षित लाल सिंग चड्ढा चित्रपटाची झलक पाहण्यासाठी चाहते उतावीळ झाले आहेत. दरम्यान निर्मात्यांनी या चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटातील पहिले गाणे 'कहानी' रिलीज केले होते आणि आता, आमिर खान प्रॉडक्शनने 'मैं की करां?' हा दुसरा ट्रॅक रिलीज केला आहे. ऑडिओ ट्रॅक कोणाच्याही कानाला सुखावणारा आहे आणि तो तुमच्या हृदयाला नक्कीच भिडेल.
आमिर खान प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर गाण्याची एक झलक शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, "आमच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटासाठी 'मैं की करां?' सारखे गाणे दिल्याबद्दल सोनू, प्रीतम, अमिताभ यांचे आभार. तुम्हालाही असेच वाटत असल्यास लाईक क्लिक करा!."