मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा बवाल हा चित्रपट शुक्रवारी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप प्रेक्षकांद्वारे पसंत केले गेले होते. आता हा चित्रपट शेवटी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुख्य कलाकार जान्हवी कपूर आणि वरुण धवन आहेत. यांची जोडी पहिल्यांदाच ऑन-स्क्रीन दिसत आहे. दरम्यान, आता चित्रपट निर्माते अॅटली कुमार यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाबद्दल सांगितले आहे.
अॅटलीने केले कौतुक :अॅटलीने कुमार यांनी ट्विटरवर लिहिले, 'बवाल' हा चित्रपट पाहायला चांगले वाटला . स्वतःच्या कादंबरीवर एक उत्तम कलाकृती पुस्तक वाचून त्याची कल्पना केल्यासारखे वाटले. सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय... वरुण सरांनी या चित्रपटात अव्वल दर्जाचे सादरीकरण केले आहे. जान्हवी तू उत्कृष्ट आहेस, संपूर्ण कलाकार आणि क्रू यांचे अभिनंदन'. त्याच्या ट्विटला उत्तर देताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट केली की, 'आम्ही सर्वजण तुमची आणि वरुणच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहोत, लवकरच तूम्ही हा चित्रपट जाहीर करा. 'अॅटलीने ही पोस्ट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरही शेअर केली आहे. 'बवाल' या चित्रपटात वरुण आणि जान्हवीने अतिशय सुंदर अभिनय केला आहे.