महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Athiya Shetty-KL Rahul wedding: अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्न, नवरदेवाच्या घरी पूर्वतयारी जोरात - पाहा व्हिडिओ - अथिया शेट्टी आणि केएल राहुल

अभिनेत्री अथिया शेट्टीसोबतच्या लग्नाआधी क्रिकेटपटू केएल राहुलच्या घरी लग्नाची पूर्वतयारी आणि लग्नाआधीच्या विधींची तयारी जोरात सुरू आहे. 23 जानेवारीला खंडाळा येथील लग्नाच्या काही दिवस आधी राहुलचे मुंबईतील घर दिव्यांनी सजले आहे.

नवरदेवाच्या घरी पूर्वतयारी जोरात
नवरदेवाच्या घरी पूर्वतयारी जोरात

By

Published : Jan 18, 2023, 2:46 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल विवाहबंधनात अडकणार आहेत. अथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा, येथील विस्तीर्ण बंगल्यात हे लव्हबर्ड्स लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या खंडाळा येथील लग्नापूर्वी, केएल राहुलचे मुंबईतील निवासस्थान सर्व दिव्यांनी सजले होते.

केएल राहुलच्या घरी लग्नाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. या जोडप्याचे 23 जानेवारी रोजी एका जिव्हाळ्याच्या समारंभात लग्न होणार असल्याचे सांगितले जात असले तरी, कुटुंबांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही. गेल्या वर्षभरापासून अथिया आणि राहुलच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. तथापि, या जोडप्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चा कमी केल्या.

नवरदेवाच्या घरी पूर्वतयारी जोरात

चित्रपट आणि क्रिकेट जगतातील काही दिग्गज या लग्नाला उपस्थित राहतील अशी खात्री बाळगली जात आहे. पाहुण्यांच्या यादीत क्रीडा जगतातील महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या नावांचा समावेश आहे तर सुपरस्टार सलमान खान आणि अक्षय कुमार देखील या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी त्यांची उपस्थिती दर्शवू शकतात. जॅकी श्रॉफ हे सुनिल शेट्टीचे जिगरी दोस्त असल्यामुळे त्यांचीही उपस्थिती निश्चित मानली जात आहे.

हेही वाचा -Aishwarya Rai In South Cinema : अजित कुमार, विघ्नेश शिवनसोबत भव्य चित्रपटात ऐश्वर्या रायची होणार दमदार एन्ट्री ?

ABOUT THE AUTHOR

...view details