मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी क्रिकेटर केएलसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. सुनील शेट्टीच्या मुंबईतील बंगल्यातून 23 जानेवारीला लग्न होणार असल्याची माहिती समोर आली होती. लग्नानंतर सुनील शेट्टी आणि राहुलच्या कुटुंबीयांमध्ये दोन रिसेप्शन पार्टीही होणार आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे पहिले जोडपे नसले तरी याआधीही फिल्मी जगतातील अनेक सुंदर अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना आपले जोडीदार बनवले आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल 2019 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि अनेकदा इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांनी 2021 मध्ये त्यांच्या नातेसंबंधाची घोषणा इंस्टाग्रामवर केली होती. आज दोघेही सात फेरे घेणार आहेत.
विराट कोहली-अनुष्का शर्मा : टीम इंडियाला अनेकदा मोठे विजय मिळवून देणारा क्रिकेटर विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्माची पत्नी म्हणून निवड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची पहिली भेट एका शॅम्पू ब्रँडच्या अॅड शूट दरम्यान झाली होती. 4 वर्षांच्या डेटिंगनंतर डिसेंबर 2017 मध्ये विरुष्काने एकमेकांचा हात धरला. या जोडप्याने इटलीमध्ये लग्न केले.