महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वाजपेयींच्या बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी साकारणार अटलजी - अटलबिहारी वाजपेयी

देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत चित्रपट निर्मात्यांनी अटलजींच्या भूमिकेसाठी अभिनेता पंकज त्रिपाठी यांची निवड केल्याची बातमी आहे.

वाजपेयींच्या बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी साकारणार अटलजी
वाजपेयींच्या बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी साकारणार अटलजी

By

Published : Jul 9, 2022, 4:47 PM IST

मुंबई- भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवन पडद्यावर आणण्यासाठी चित्रपट निर्माते विनोद भानुशाली आणि संदीप सिंग एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा दमदार अभिनेता पंकज त्रिपाठी 'मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए-अटल' या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार असल्याची बातमी आहे. बायोपिक पुस्तक 'द अनटोल्ड वाजपेयी अँड पॅराडॉक्स'वर आधारित असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी पॉलिटिकल ड्रामा चित्रपटासाठी पंकज त्रिपाठी यांची निवड केली आहे. विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान, कमलेश भानुशाली आणि विशाल गुरनानी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. पुढील वर्षी 2023 च्या सुरुवातीला या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. खरंतर अटलजींच्या ९९ व्या जयंतीनिमित्त ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे.

'अटल' हा बायोपिक चित्रपट भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज प्रस्तुत आहे आणि विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान, कमलेश भानुशाली आणि विशाल गुरनानी निर्मित आहेत. जुही पारेख मेहता, जीशान अहमद आणि शिवव शर्मा यांनी याची सहनिर्मिती केली आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना विनोद म्हणाले होते की, 'मी जन्मभर, उत्कृष्ट राजकारणी आणि दूरदर्शी अटलजींचा मोठा चाहता राहिलो आहे. अटलबिहारी वाजपेयीजींमध्ये वरील सर्व गुण होते. आपल्या राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे आणि भानुशाली स्टुडिओ लिमिटेड त्यांचा वारसा रुपेरी पडद्यावर आणत आहे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.

संदीप सिंग म्हणाले की, 'चित्रपट निर्माता असल्याने मला असे वाटते की, अशा न सांगितल्या जाणाऱ्या कथांशी संवाद साधण्यासाठी सिनेमा हे सर्वोत्तम माध्यम आहे, जे केवळ त्यांच्या राजकीय विचारसरणीवर प्रकाश टाकणार नाही, तर त्यांचे मानवी आणि काव्यात्मक पैलूही उलगडेल. अटलजी हे विरोधकांसह भारताचे सर्वात प्रगतीशील पंतप्रधान राहिले आहेत.''

हेही वाचा -मणिरत्नम यांनी 'पोन्नियिन सेल्वन' बनवण्याचा 'तीनदा' केला होता प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details