मुंबई - Ask SRK: सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज झालाय. त्यानं 'X' वर यासाठी चाहत्यांशी संवाद साधला आणि दिलखुलास बातचीत केली. यावेळी बोलताना त्यानं आपण कोणत्या कारणामुळे असुरक्षित होतो याचाही खुलासा केला. आस्कएसआरके या एक्सवरील सत्रामध्ये राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' चित्रपटावर प्रकाश टाकला.
शाहरुख खानच्या या वर्षी 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'पठाण' आणि 'जवान' झालेल्या चित्रपटांना उत्तुंग यश मिळालं. आता तो बहुप्रतिक्षित 'डंकी'च्या रिलीजची उत्सुकतेनं प्रतीक्षा करत आहे. यामध्ये तो विकी कौशल, तापसी पन्नू आणि बोमन इराणीसारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करत आहे. आजवर त्याच्या फिल्मोग्राफीमध्ये 'डंकी' चित्रपटाला विशेष स्थान असल्याचं तो म्हणाला.
शाहरुख खानची भावनिक बाजू जाणून घेताना, एका चाहत्यानं 'डंकी'तील नुकत्याच रिलीज झालेल्या 'निकले थे कभी हम घर से' या भावनिक गाण्याच्या संदर्भात त्याच्या "भावनिक कमजोरी" बद्दल प्रश्न विचारला. प्रत्युत्तरादाखल शाहरुखनं उघडपणे कबूल केले की त्याचं कुटुंब त्याचा भावनिक कमकुवत बिंदू आहे. ही भावना प्रत्येकाशी संबंधित आहे यावर तो जोर देऊन बोलला.
चित्रपटसृष्टीतील शाहरुखची कारकीर्द अनुभवी असूनही किंग खाननं हे कबूल केलं की, 'डंकी' चित्रपटासाठी वचनबद्ध होण्यापूर्वी त्याच्याकडं मर्यादित ज्ञान होतं. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि लेखक अभिजात जोशी यांनी हा चित्रपट आपल्या लक्षात आणून दिल्याचा खुलासा त्यानं केला. 'डंकी'मध्ये सामील होण्याआधी त्याला काय माहित होते याबद्दल चौकशी करणाऱ्या एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख स्पष्टपणे म्हणाला, "खरंतर क्वचितच काही माहिती होतं. राजू आणि अभिजातने ते माझ्या माहितीचं करुन दिलं. हे मनोरंजक होतं... धक्कादायक आणि खूपच जबरदस्त अनुभव होता. त्याबद्दल शिकलो आणि त्याचे काही भाग चित्रित केले."
'डंकी' या चित्रपटाचं वर्णन शाहरुखनं आकर्षक आणि धोकादायक असं केलं. या चित्रपटाचं कथानक 'डाँकी फ्लाइट' म्हणून ओळखल्या जाणार्या बेकायदेशीर इमिग्रेशन तंत्राभोवती केंद्रित आहे. या प्रकल्पाविषयी माहिती नसतानाही काम करणं हे भारावून टाकण्यासारखं होतं.
'डंकी'चित्रपटाची रिलीज डेट जवळ आल्यानं चाहत्यांची अपेक्षा वाढत चालली आहे. चित्रपटाबद्दल शाहरुख खाननं केलेले खुलासे, नुकतंच रिलीज झालेलं भावनिक गाणं यामुळं 'डंकी'च्या अपेक्षा वाढल्या आहेत. या महिन्याच्या अखेरीस प्रभासचा 'सालार' आणि मोहनलालच्या कोर्टरूम ड्रामा 'नेरू'सोबत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा -
- अमिताभ बच्चन यांचा करियरवर प्रभाव असल्याचा रणवीर सिंगनं केला खुलासा
- प्रभासच्या सालारचा ट्रेलर रिलीज, उत्कंठा वाढवणाऱ्या दृष्यांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
- 'आजचा दिवस 'सालार'चा' म्हणत प्रभास फॅन्सचा निर्मात्यांनी वाढवला उत्साह