मुंबई :तारक मेहता का उल्टा चष्मा हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. हा शो गेल्या अनेक दिवसांपासून वादांना तोंड देत आहे. खरं तर, तारक मेहता शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर शोमध्ये रोशन सोधीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्री आणि मोनिका भदोरिया यांनी छळ केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान याप्रकरणी अभिनेता शैलेश लोढाने त्यांच्यावर प्रलंबित रकमेसाठी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता असित मोदी यांनी आता एक खुलासा केला आहे, त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, त्यांनी कधीही कोणावर अन्याय केला नाही.
जेनिफर मिस्त्री प्रकरणावर असित मोदी काय म्हणाले? :असित मोदी यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, 'भावनिकदृष्ट्या मला वाईट वाटते. कारण मी प्रत्येकाला माझ्या कुटुंबाप्रमाणे वागवतो. आणि, मी पुन्हा सांगतो की मी कधीही कोणाचेही वाईट केले नाही. मी सर्व काही केले आहे कारण मी माझ्या शोद्वारे दररोज आनंद देत आहे. त्यामुळे मी माझ्या टीमला खूप आनंदी आणि चांगल्या आणि सकारात्मक वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करतो.' असे त्यांनी सांगितले.
असित मोदींवर काय आरोप आहेत? :मीडिया रिपोर्टनुसार, जेनिफरने मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात कामाच्या ठिकाणी लैंगिक गैरवर्तनाची तक्रार दाखल केली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोमध्ये बावरीची भूमिका करणारी अभिनेत्री मोनिका भदोरियाने काही दिवसापूर्वी म्हटले होते की, सेटवर असणे तिच्यासाठी छळ असल्यासारखे आहे. या शोच्या सेट मानसिक त्रास होतो असे तिने म्हटले. शोमध्ये मेहता जीची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढाने देखील काही पैसे थकबाकी असल्याचे आरोप या मालिकेच्या निर्मात्यांवर करत गुन्हा दाखल केला होता.
'तारक मेहता'ने नुकतीच टीव्हीवर १५ वर्षे पूर्ण केली :२८ जुलै २००८ रोजी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोचा पहिला प्रीमियर झाला. ही मालिका गोकुळधाम सोसायटीत राहणाऱ्या जेठालाल गडा त्यांची पत्नी दया बेन, चंपक लाल गडा, टप्पू, तारक मेहता, अंजली मेहता आणि इतर पात्रांभोवती फिरणारा असून ही मालिका खूप मनोरंजक आहे. नुकतेच या शोने १५ वर्षे पूर्ण केले आहे. यावेळी असित मोदीने सांगितले की, दिशा वकानी उर्फ दयाबेन शोमध्ये पुन्हा परत येईल.
हेही वाचा :
- RARKPK Box Office Collection Day 5: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या कमाईत बॉक्स ऑफिसवर घसरण....
- Kangana Ranaut Vs Javed Akhtar : कंगनाच्या खासगी तक्रारीनंतर न्यायालयाच्या समन्स विरोधात जावेद अख्तर यांची सत्र न्यायालयात धाव, नेमके प्रकरण काय?
- Nitin Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या