मुंबई - सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई जोरात सुरू आहे. बराच काळ लांबणीवर पडलेले सेलेब्रिटींचे विवाह पार पडत आहेत. अलिकडेच सुनिल शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीचा क्रिकेटर के राहुलसोबत विवाह खंडाळ्यात पार पडला. त्याआधी विकी कौशल आणि कॅटरिना कैफचा शाही विवाह झाला. आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची धूम सुरू झाली आहे. अशातच कियारा अडवाणीच्या लग्नाच्या बातम्या झळकत असताना एक नवीच बातमी वाचकांचे लक्ष वेधत आहे. टीव्ही शो शार्क टँक इंडियाचे जज असलेल्या अश्नीर ग्रोव्हर यांनी एकदा खुलासा केला आहे की कियारा अडवाणीमुळे त्यांचा जवळजवळ घटस्फोट झाला होता.
अश्नीर ग्रोव्हरने सांगितले की कियारा अडवाणीमुळे त्याचा घटस्फोट झाला असता. त्याने एक दोगलापन नावाच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. यात एक प्रकरण कियारा अडवाणीमुळे आपला घटस्फोट झाला असता यावर आहे.
एकदा अश्नीरच्या मित्रांनी त्याला त्याच्या लग्नाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, मी विवाह जमवणाऱ्या संस्थेशी संपर्क केला होता. तेव्हा त्यांनी कियारा अडवाणी परफेक्ट मॅच होत असल्याचे सांगितले होते. तेव्हा कियारा त्याला योग्य नसल्याचे त्याच्या आईने सांगितले होते. तेव्हा अश्नीर गंमतीने आईला म्हणाला होता की, आजकाल बाजारात काय सुरू आहे याची कल्पना नाही. जर लग्न झाले असते तर कियारा तुझी सून झाली असती.