महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ashish Vidyarthi and Rupali Barua : आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ अज्ञातस्थळी करताहेत एन्जॉय

अभिनेता आशिष विद्यार्थीने नुकतेच रुपाली बरुआशी दुसरे लग्न केले आहे. विवाहानंतर हे जोडपे सुट्टीचा आनंद घेत आहेत.

Ashish Vidyarthi and Rupali Barua
आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ

By

Published : Jun 15, 2023, 6:59 PM IST

मुंबई- अभिनेता आशिष विद्यार्थीने गेल्या महिन्यात आसाममधील फॅशन उद्योजिका रुपाली बरुआ यांच्याशी एका छोट्या समारंभात लग्न केल्याने जोरदार चर्चा झाली होती. या जोडप्याने केवळ जवळचे मित्र आणि कौटुंबिक नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह केल्यानंतर नवविवाहित जोडपे आता एकत्र काही वेळ एन्जॉय करण्यासाठी अज्ञात ठिकाणी गेले आहे. गुरुवारी अभिनेता आशिष विद्यार्थी ने त्याचे इंस्टाग्राम प्रोफाईल अपडेट केले असून तो स्वत:चा आणि त्याची पत्नी रुपालीच्या एका नवीन फोटोसह परदेशात आराम करताना दिसत आहे.

फोटोमध्ये नवविवाहित जोडपे कॅमेरासाठी हसत पोज देताना दिसते. मित्र परिवार, कुटुंबीय आणि हितचिंतकांनी दिलेल्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. काही आठवड्यांपूर्वी आशिषने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात आपली रुपाली बरुआशी कशी ओळख झाली, त्यात वाढ कशी झाली व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला याबद्दल सांगितले आहे. 'रुपाली आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती 50 वर्षांची आहे, आणि मी 57 वर्षांचा आहे, साठीचा नाही. अशा वेळी वय हे अप्रासंगिक आहे. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आनंदी राहण्याची क्षमता आहे'., असे यात म्हटले होते.

आशिष विद्यार्थी यांचा पूर्वी राजोशी विद्यार्थीसोबत विवाह झाला होता. त्याच्या कामाच्या आघाडीबद्दल बोलायचे तर, त्याने आपल्या कारकिर्दीत हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, ओडिया, मराठी आणि बंगाली अशा भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1942: एक प्रेम कथा, बाजी, जीत, मृत्युदाता, अर्जुन पंडित, मेजर साब, सोल्जर, हसिना मान जायेगी, जानवर, वास्तव: द रिअॅलिटी, जोरू का गुलाम, शरणार्थी, जोडी. नंबर 1 आणि क्यो की... मैं झुठ नहीं बोलता हे काही त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय प्रतिभेने पात्रे जीवंत केली आहेत. सर्व प्रकारच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. चरित्र अभिनेत्यापासून ते खलनायकापर्यंत मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले.

ABOUT THE AUTHOR

...view details