मुंबई- अहान शेट्टीची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूडच्या स्टार मुलांनी हजेरी लावली होती आणि या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ आधीच व्हायरल झाले आहेत. आर्यन खान, सुहाना खान, शनाया कपूर, खुशी कपूर आणि अहान आणि तानियाचे मित्र असलेले इतर स्टार किड्स या कार्यक्रमाला उपस्थित होते. तिच्या वाढदिवसानिमित्त, एक प्रभावशाली आणि फॅशन डिझायनर असलेल्या तानिया श्रॉफ हिने मुंबईत स्टार-स्टडेड बर्थडे बॅशचे आयोजन केले होते.
बर्थ डे पार्टीला स्टार किड्सची मांदियाळी - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटिरियर डिझायनर गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान शनाया आणि त्याच्या मित्रांसोबत पोहोचताना दिसला. शाहरुख आणि गौरी यांची मुलगी सुहाना खान थोड्या वेळाने वेगळ्या कारमधून पार्टीसाठी पोहोचली. पार्टीसाठी, शनायाने चकचकीत शॉर्ट स्कर्टसह ब्लॅक टँक टॉप घालून आकर्षक लूक निवडला, तर आर्यन काळ्या हुडीमध्ये सुंदर दिसत होता. वरुण धवनची भाची अंजिनी धवन देखील पार्टीत दुसर्या व्हिडिओमध्ये दिसली. निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूरसोबत ती कार्यक्रमस्थळी पोहोचली. खुशीने पार्टीत मरून टॉप, ब्लॅक ट्राउजर आणि ब्लॅक शूज घातले होते. अंजनीने पांढऱ्या हिल्ससह काळ्या आणि पांढर्या रंगाचा ड्रेस घातला होता.